Bajrang Sonawane : बीडच्या मस्साजोगचे सरसपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. ९ डिसेंबरला आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आलं. आज संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. दरम्यान खासदार बजरंग सोनावणे यांनी या प्रकरणातल्या आरोपींबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात निषेध मोर्चाही झाला होता, त्याआधी बीड मध्येही निषेध मोर्चा झाला होता त्या मोर्चात संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवी सहभागी झाले होते. आता खासदार बजरंग सोनावणेंनी महत्त्वाचं भाष्य या प्रकरणाबाबत केलं आहे.

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

हे पण वाचा- Anjali Damania Social Post: “काल एक गोपनीय पत्र आलं”, अंजली दमानियांचा वाल्मिक कराडबाबत नवा दावा चर्चेत!

काय म्हणाले बजरंग सोनावणे?

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आज संतोष देशमुख यांचं कुटुंब घेणार आहे. देशमुख कुटुंब न्याय मागेल, तो न्याय त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान आम्ही राज्यपालांना भेटलो होतो. संभाजीराजेंनी आमच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. तसंच या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे त्यालाही शिक्षा झाली पाहिजे. ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. एसआयटी नेमली, सीआयडीचा तपास सुरु आहे. कुठल्या तपासासाठी पोलीस कोठडी घेतली जाते आहे? मोबाइल कुठे ते कसं समजत नाही? पोलिसांसाठी हे सगळं कठीण आहे? जर आरोपी पोलिसांना माहिती देत नसतील तर त्यांना जनतेच्या स्वाधीन करा, जनता काय करायचं ते पाहून घेईल” असं बजरंग सोनावणे म्हणाले.

मास्टरमाईंडलाही शिक्षा झाली पाहिजे-सोनावणे

“धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या बैठकीत काय ठरलं त्याचे तपशील माझ्याकडे नाहीत. ते मला जर या दोघांपैकी कुणी सांगितले तर मी त्यावर बोलू शकतो. आत्ता आमची भूमिका हीच आहे की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि जो मास्टरमाईंड आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे” असंही सोनावणेंनी म्हटलं आहे.

Story img Loader