पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण, मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत, असे वक्तव्य भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं होते. यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, आता पंकजा मुंडे विचारांचा दाखला देत त्याप्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

बीडमधील सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्यावर गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा वारसा चालवल्याचा आरोप केला जातो. मात्र, मी फक्त गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा वारसा चालवत नाही. तर, पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपायी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या विचारांचा मी वारसा चालवते. गोपीनाथ मुंडेंचा विचार यांच्यापेक्षा काय वेगळा आहे.”

हेही वाचा – “बीकेसीत गद्दारांची सर्दी, शिवाजी पार्कवर निष्ठेची वर्दी”; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

“काही दिवसांपूर्वी एक अर्धवट क्लिप व्हायरल करण्यात आली. त्यानंतर पंकजा मुंडेंना पेटीतच बंद करतील, असं वातावरण करण्यात आलं. मी जर शत्रूविषयी वाईट बोलत नाही. तर, ज्यांच्या विचारांचा वारसा चालवते, त्यांच्याबाबत वाईट बोलण्याचे संस्कार माझ्या रक्तात नाही,” असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाच्या विचाराचे एक घाव…”; शहाजी बापू पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचा विचार…”

“२०२४ ला पक्षाने तिकीट दिलं तर…”

“माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. एवढे दिवस मी कधीच यावर बोलले नाही, मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी हा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे,” असे पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.