लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी शहरातील विविध भागांत चित्रपट अभिनेते विवेक ओबेरॉय याच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला, तर काँग्रेसच्या वतीने सर्व प्रभागांत नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली प्रचारफेऱ्या काढण्यात आल्या.
काँग्रेसच्या वतीने अभिनेता रीतेश देशमुख यांचे उदगीर, अहमदपूर, लोहा, कंधार येथे रोड शो घेण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने मंगळवारी दुपारी शहरातील बसवेश्वर चौकापासून अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा रोड शो घेण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, भाजप सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली तरुण दुचाकीवर रोड शोमध्ये सहभागी झाले होते. सुमारे तीन तास रोड शो चालला. मार्केट यार्ड येथे रोड शोची सांगता करण्यात आली.
सोमवारीच राहुल गांधी यांची सभा संपूर्ण ताकद लावून केल्यामुळे काँग्रेसने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या पुढाकाराने प्रचारफेऱ्या काढल्या. विविध प्रभागात दिवसभर या प्रचारफेऱ्या सुरू राहिल्या. सायंकाळी प्रचाराची वेळ संपल्यानंतर प्रमुख पक्षांनी प्रचार थांबवला.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2014 रोजी प्रकाशित
भाजपकडून ‘रोड शो’, काँग्रेसच्या प्रचारफेऱ्या
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी शहरातील विविध भागांत चित्रपट अभिनेते विवेक ओबेरॉय याच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला, तर काँग्रेसच्या वतीने सर्व प्रभागांत नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली प्रचारफेऱ्या काढण्यात आल्या.
First published on: 15-04-2014 at 03:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp road show canvassing stop latur