संगमनेर : पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज, शुक्रवारी चंदनेश्वर विद्यालयाच्या स्कूल बसला अपघात होऊन चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाची बस (एमएच १४ बीए ८९३२) साकुर आणि आसपासच्या भागातून सुमारे ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी घाटातून शाळेकडे येत होती. पुणे-नाशिक महामार्गावर काँक्रिटीकरण कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. आनंदवाडी शिवारात बस आल्यानंतर समोरून आलेल्या एका वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन अर्धवट स्थितीत उलटली.
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, अंमलदार अमित महाजन, डोळासने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्य सुरू करत जखमी विद्यार्थ्यांना चंदनापुरी घाटावरील गुंजाळ रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. चिंताग्रस्त पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली. आमदार अमोल खताळ यांनी रुग्णालयात विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाची बस (एमएच १४ बीए ८९३२) साकुर आणि आसपासच्या भागातून सुमारे ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी घाटातून शाळेकडे येत होती. पुणे-नाशिक महामार्गावर काँक्रिटीकरण कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. आनंदवाडी शिवारात बस आल्यानंतर समोरून आलेल्या एका वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन अर्धवट स्थितीत उलटली.