वाई : छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील महाबळेश्वर येथे म्हटले आहे.

किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. महेश लांडगे, आ. नितेश राणे,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव आदी उपस्थित होते.

chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप
Vijay Shivtare
मुख्यमंत्र्याचं ऐकलं नाही, पण ओएसडींच्या फोननंतर शिवतारे नरमले; माघार घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…

इतरांच्या हक्काला बाधा न पोहचत आम्हाला आरक्षण मिळावं ही जरांगे पाटील यांची मागणी होती. अधिसूचनेत सर्व बाबी स्पष्ट पणे नमूद केल्या आहेत. ही अधिसूचना इतर समाजाला सुद्धा मार्गदर्शक ठरेल. छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत त्यांनी या अधिसूचनेची माहिती घेतल्या नंतर त्यांचाही याबाबतचा गैरसमज दूर होईल. मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा-सातारा : वारसा कळण्यासाठी गडकोट मोहीमा महत्त्वाच्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शनिवारी मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला तो कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हती त्यांना प्रमाण पत्र मिळण्यासाठी होता. नारायण राणेंनी केलेल्या विरोधाबाबत बोलताना ही अधिसूचना जुन्या कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांच्या साठी आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर मागासवर्गीय आयोग एम्परिकल डेटा गोळा करण्याचे काम करत आहेत त्या मध्ये ३६ जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास कसा आहे हे त्या डेटा मधून येईल. देवेंद्र फडणवीस असताना जे आरक्षण दिलं होत त्यात त्रुटी राहिल्या होत्या त्याबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या नंतर विशेष अधिवेशन घेऊन टिकणार आरक्षण राज्यसरकार देणार आहे. या वेळी इतर कोणावर अन्याय होणार नाही. कुणबी आरक्षणाचा विषय वेगळा आहे आणि मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यायचा विषय वेगळा आहे. कुणीही गैरसमज करून घेऊ नये. मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्याचा निर्णय होण्यासाठी मागासवर्ग आयोग नेमला आहे.

आणखी वाचा-‘मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसली का?’, विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणाले…

मराठा समाजाने अनेकांना संधी दिली, मोठं केलं. मात्र त्यांनी संधीचे सोन केलं नाही. त्यावेळी मराठा समाजाला वंचित ठेवले. या सर्वेक्षणाच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण करणे हीच त्यांची खरी वृत्ती दिसून येते. त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळा आणायचे काम करतायत. त्यामुळे सर्व पक्षांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.