सातारा : शिवस्वराज्य सर्किट उभारणे, सातारा विभागास नवीन बस द्याव्यात, कासला एक किलोवॅटचा लघु जलविद्युत प्रकल्प उभारणीस मान्यता द्यावी, जिहे-कठापूरला निधी द्यावा, साताऱ्यातील जनावरांच्या दवाखान्याची जागा पालिकेला हस्तांतरित करावी, कराड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, क्षेत्रमाहुली येथे नवीन जिल्हा कारागृह उभारावे, वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करावे आदी मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईत भेट घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. या वेळी त्यांनी शिवस्वराज्य सर्किट विकसित करणे, मिरज लोकमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत सातारा लोहमार्ग दूरक्षेत्राचे लोहमार्ग पोलीस ठाण्यात रूपांतर करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा परिवहन विभागातील अनेक बस जुन्या आणि नादुरुस्त व बंद स्थितीतील आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी नवीन बस उपलब्ध व्हाव्यात, कास पाणीपुरवठा योजनेवर आधारित एक किलो वॅट क्षमतेचा लहान जलविद्युत प्रकल्प करण्यात येत आहे, त्यास मान्यता द्यावी, सातारा जिल्हा तुरुंगाची जागा मध्यवस्तीत आहे, त्यामुळे अनेकदा सुरक्षेला अडथळा असतो, त्यामुळे क्षेत्रमाहुली येथे नवीन कारागृह उभारण्यासाठी जागा हस्तांतरित करणे, जिहे कठापूर योजनेस निधी द्यावा, सातारा शहरातील गुरांचा दवाखाना असलेली जागा पालिकेकडे हस्तांतरित करावी, कासला एक किलोवॅटचा लघु जलविद्युत प्रकल्प उभारणीस मान्यता द्यावी, जिहे-कठापूरला निधी द्यावा, साताऱ्यातील जनावरांच्या दवाखान्याची जागा पालिकेला हस्तांतरित करावी, कराड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, क्षेत्रमाहुली येथे नवीन जिल्हा कारागृह उभारावे आदी मागण्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिफारशींचे अवलोकन करून संबंधित विभागांना हे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.