गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मशिदींवरील भोंगे आणि त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतेलली भूमिका याची जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंनी आधी गुढी पाडवा मेळाव्यात आणि नंतर ठाण्यातल्या उत्तर सभेमध्ये मांडलेली भूमिका यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असून त्यामुळे या चर्चेला अजूनच उधाण आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या निर्णयावरून राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं. तसेच, “महाराष्ट्रात योगी नसून फक्त सत्तेचे भोगी आहेत” अशा शब्दांत राज्य सरकारवर टीका देखील केली होती. यावरून दावे-प्रतिदावे सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भूमिका मांडली आहे.

trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह

“..तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद होणार नाहीत!”

सांगलीमध्ये झालेल्या सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत इशारा दिला आहे. “उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला म्हणे. घेतला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, दिवाळीचे असे १५ दिवस काढले आहेत. यातले ३ दिवस वेळ वाढवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी आहे. उद्या जर कुठला निर्णय घ्यायचं झालं, तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद होणार नाहीत”, असं अजित पवार म्हणाले.

“…तोपर्यंत हे महाविकास आघाडीचं सरकार चालत राहील”, अजित पवारांचं सूचक विधान; भाजपावर साधला निशाणा!

“आपल्याकडे तर रात्री वेगवेगळ्या ठिकाणी…!”

दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांबाबत निर्णय घेतला, तर तो इतरही कार्यक्रमांना लागू होईल, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “शिर्डीला साईबाबांची काकड आरती पहाटे ५ वाजता सुरू होते. उद्या त्यातही काही अडचणी येऊ शकतात. आपल्याकडे तर रात्री वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असतात. काही ठिकाणी प्रवचन, कीर्तन असतं. हरिनाम सप्ताह असतो. हे सगळं रात्रीच आपल्या गावांमध्ये असतं. लाऊडस्पीकर चालू असतो. आपण कधी कुणाला बोलत नाही. काही ठिकाणी वाघ्या-मुरळीचे कार्यक्रम चालू असतात”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“आरे बाबांनो, तुम्ही नियम लावायला जर गेलात… तिथे उत्तर प्रदेशमध्ये जो निर्णय झालाय, त्यानुसार आम्हाला माहिती मिळाली आहे की मथुरेमध्ये पहाटेचा लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला. जर एखादी गोष्ट सर्वांच्या संमतीने न त्रास होता होत असेल, तर नवीन प्रश्न निर्माण करण्याचं कारण काय?” असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.