सावंतवाडी: भारत सरकारच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड अल्फान्सो मँगो (हापूस आंबा) आणि प्रक्रिया केलेल्या काजूंना (Processed Cashew) समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे या दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठ मिळण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

ग्राहक आणि उत्पादक दोघांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व ODOP उत्पादन विक्रेते, औद्योगिक समूह (क्लस्टर) आणि उद्योगांना त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर अधिकृत ODOP लोगो वापरण्याचे आवाहन केले आहे. या लोगोमुळे ग्राहकांना उत्पादनाची दृश्यमानता (Visibility), गुणवत्ता आणि खरेपणाची ओळख पटण्यास मदत होईल.तसेच, यामुळे ODOP उत्पादकांना त्यांच्या मालासाठी उत्तम बाजारपेठ मिळवणे सोपे होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) उपक्रम देशभरात राबवला जात आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याने सक्रिय सहभाग घेतला असून, राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून ७२ प्रमुख ODOP उत्पादने अधिसूचित केली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देवगड अल्फान्सो मँगो आणि प्रक्रिया केलेले काजू ही दोन उत्पादने निवडण्यात आली आहेत. यामुळे जिल्ह्याच्या कृषी आणि औद्योगिक विकासाला एक नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.