हवाई वाहतुकीची वाढती मागणी व प्रवासी संख्या विचारात घेता मुंबई महानगरात आणखी एक ‘ग्रीनफिल्ड विमानतळ’ उभारण्यास केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसेच हे विमानतळ उभारण्यासाठी सिडकोची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबई परिसरात नवीन विमानतळ उभारण्याची शासनाची योजना आहे काय, असा प्रश्न लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. मुंबईत २०३०-३१ पर्यंत १०० दशलक्ष प्रवासी प्रतिवर्षी वाढण्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत मुंबईमध्ये श्री छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध आहे. त्याच्या विस्ताराचे व आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.