चंद्रपूर जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८७२ झाली आहे. जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत करोनामुक्त झाल्याले ५०६ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. तर, जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यात १६ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. मागील पंधरवाड्यातील ही कमी संख्या आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तपासण्या वाढविण्यात आल्या असून नागरिकांनी कोणतेही लक्षण आढळल्यास तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले गेले आहे. करोना रुग्णांची संख्या येत्या काळात वाढणार असून नागरिकांनी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतर पाळणे व शक्यतो घराबाहेर न निघण्याच्या सूचना पाळाव्यात असे देखील आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत असल्यामुळे या भागातील नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याशी न खेळता सर्व सूचनांचे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार ५८४ स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी ३२ हजार ४१७ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत १३१ अँटीजेन टेस्टसह ७४१ प्रचलित आरटीपीसीआर स्वॅब मिळून जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ८७२ स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. आज आढळून  आलेल्या बाधितामध्ये मुंबई येथून आलेल्या ब्रह्मपुरी शहरातील २५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. तसेच, नागभिड तालुक्यातील पुणे येथून परत आलेला पुरुष व एक महिला तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळली आहे. आंध्र प्रदेश राज्यातील नेल्लूर येथून आलेली १९वर्षीय युवती पॉझिटीव्ह ठरली आहे. याशिवाय, चंद्रपूर शहरा नजीकच्या ताडाळी परिसरात बिहार राज्यातून आलेल्या सहा नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याच कामगारांच्या संपर्कात आल्यामुळे अन्य तीन नागरिक देखील पॉझिटिव्ह ठरले आहेत.नागपूर येथून प्रवास करून आलेल्या तुकुम चंद्रपूर परिसरातील दोन नागरिक पॉझिटिव्ह ठरले आहेत. तर बापट नगर येथील एक युवक संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. आज अशाप्रकारे एकूण १६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur district so far 506 people have overcome corona msr
First published on: 11-08-2020 at 10:35 IST