सांगली : जिल्ह्यातील शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यात बुधवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. दिवाळीत थंडी सुरू होण्याची अपेक्षा असताना पावसाचे आगमन द्राक्ष बागांना धोकादायक ठरणारे आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान असून काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. शिराळा तालुक्यातील मांगले परिसरात पहाटे पासून पाऊस सुरु होता.
हेही वाचा : “कुणबी प्रमाणपत्र घेऊन यायचं आणि ओबीसींना बाहेर ढकलायचं…”, छगन भुजबळ यांचा दावा
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तासगाव, पलूस भागात सातनंतर पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास हलका पाऊस पडला. द्राक्षाच्या फळछाटण्या झाल्या असून सध्या द्राक्ष घड कळी, फुलोऱ्याच्या स्थितीत असून यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने बुरशीजन्य दावण्या रोगाचा प्रादुर्भाव बळावण्याची शक्यता आहे.