वाई: साताऱ्यातील धोम धरणाचा उजवा कालवा व्याजवाडी ( ता वाई) जवळ फुटला. अचानक कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. कालवा फुटून पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने शेतीचे नुकसान टळले आहे. साताऱ्यातील धोम धरणाचा उजवा कालवा व्याजवाडी (ता. वाई) जवळ कालव्याच्या तळाला पहाटेचा सुमारास भगदाड पडून फुटला. अचानक कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. कालवा फुटून पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने शेतीचे नुकसान टळले आहे. मागील पन्नास दिवसांपासून कालव्यातून १९० ते २०० क्युसेक्सने पाणी सुरु होते. कालवा फुटून पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने शेती नुकसानीचा अनर्थ टळला. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.

हेही वाचा : राम मंदिरावर हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांना दूरध्वनी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कालवा फुटून पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने शेतीचे नुकसान टळले आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने कालव्यातील पाणी बंद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी याच धोम धरणाचा डाव्या कालव्याला भगदाड पडून ऊस तोड कामगारांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले होते. यामुळे मागील काही दिवसांपासून पाण्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. मागील एक महिन्यापासून हा कालवा सुरु होता. कालवा सुरु करण्यापूर्वी या ठिकाणी डागडुजी केली असल्याचे पाटबंधारे सूत्रांनी सांगितले. घटनास्थळी पाटबंधारे अभियंता योगेश शिंदे, उपअभियंता निलेश ठोंबरे, शाखा अभियंता अजय गोळे यांनी भेट दिली.