सिंधुदुर्ग: कुडाळ शहरात नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत भाजप आणि ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि एकमेकांना भिडले. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर दोन्ही मिरवणुका मार्गस्थ झाल्या

नारळी पौर्णिमेनिमित्त आज संध्याकाळी कुडाळ शहरात भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वेगवेगळ्या मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या मिरवणुकीला दुपारी तीन वाजताचा वेळ दिला होता तर ठाकरे शिवसेनेच्या रिक्षा रॅलीला दोन तासांचा वेळ देण्यात आला होता. पण दोन्ही रॅली साधारण एकाच वेळी सुरु झाल्या. ठाकरे शिवसेना कार्यालयाकडे दोन्ही पक्षांच्या रॅली आमनेसामने येताच वाहतुकीची कोंडी झाली.

हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांनी नवाब मलिकांच्या मुलीवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला. याचवेळी भाजप आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या दरम्यान राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कुडाळ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आवरले.