सोलापूर : नामसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या भावाची बनावट सही करून मिळकतीचे कुलमुखत्यारपत्र दुसऱ्याला देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकासह दोघाजणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात रफिक गफूर शेख (वय ५८, रा. देशमुख प्लॉट, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा फसवणुकीचा प्रकार ३० जून १९९७ ते ३ मे २०२३ या कालावधीत सोलापुरात दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. याप्रकरणी नरसय्या रामदास इप्पाकायल आणि नरसिमलू यल्लप्पा कोंडा अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा ; माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियदर्शनी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक असलेल्या नरसय्या इप्पाकायल व त्यांचे थोरले बंधू नरसय्या रामदास इप्पाकायल यांच्यात नामसाधर्म्य आहे. त्याचा गैरफायदा घेऊन धाकट्या नरसय्या इप्पाकायल याने थोरल्या नरसय्या इप्पाकायल यांची बनावट सही करून नरसिमलू कोंडा यांना कुलमुखत्यारपत्र लिहून दिले. या खोट्या कुलमुखत्यारपत्राच्या आधारे प्रियदर्शनी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक तोतया व्यक्तीने दुसऱ्या आरोपीच्या मदतीने दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकतीची दस्त नोंदणी केली. यात शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.