अलिबाग : कोकणात मासेमारी हंगामाला १ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. पण किनारपट्टीवरील भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे १ ऑगस्टचा मासेमारीचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.

गेली दोन महिने कोकण किनारपट्टीवर मासेमारी बंद होती. त्यामुळे मच्छिमारांनी त्यांच्या बोटी किनारपट्टीला शाकारून ठेवल्या होत्या. मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलैला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे मासेमारीच्या नव्या हंगामाची मच्छीमार सुरुवात करणार आहेत. यासाठी लगबग सुरु झाली आहे. बोटीची डागडुजी आणि रंगरंगोटी आणि मच्छीमार जाळ्यांची देखभाल दुरुस्तीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. डीझेल, बर्फ अन्न धआन्य याची जमवाजमव सध्या सुरू आहे. किनाऱ्यावर जाळी विणणे, होड्यांना तेल लावणे, बोर्ड रंगवणे या सारखी कामे सुरू आहेत.

हेही वाचा…राज्यात ८१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी; २० हजार तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता!

परंतु किनारपट्टीवरील भागात सोसाट्याचे वारे वाहत आहेत. पावसाचा जोरही कायम आहे. त्यामुळे मच्छीमार बोटी समुद्रात उतरवाव्यात अथवा नाही याबाबत साशंक आहेत. त्यामुळे अनेक मच्छीमारांनी अद्याप आपल्या बोटी पाण्यात उतरवेल्या नाहीत. त्यामुळे १ ऑगस्टचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.

दरवर्षी समुद्रात भरपुर मच्छी मिळू दे आणि नुकसान टळू दे अशी मनोभावे प्रार्थना करून, तसेच मुहूर्त काढून, पुजा अर्चा करून मासेमारी होड्या समुद्रात सोडल्या जातात. काही जण नारळी पोर्णिमेनंतर आपल्या बोटी पाण्यात उतरवत असतात. त्यामुळे यंदा मोजक्या बोटीच १ तारखेला मासेमारीला जातील अशी शक्यता आहे.

हेही वाचा…Gulabrao Patil : “संजय राऊतांना दाढी येत नाही, म्हणून त्यांनी…” ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील ‘त्या’ आरोपाला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर अजून कमी झालेला नाही. पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे बोटी समुद्रात उतरवाव्यात अथवा नाही याबाबत अनेक मच्छीमार साशंक आहेत. – सचिन पावशे, मच्छीमार