गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा अवघ्या २ हजार ५९२ मतांनी निसटता पराभव झाला. आमदार  भास्कर जाधव यांनी ७१ हजार २४१ मते घेऊन गुहागरचा गड राखण्यात यश मिळविले. गुहागर विधानसभा मतदारसंघात यावेळची लढत अतिशय रंगतदार होणार हे चित्र मतदानापूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र सलग तीन टर्म निवडून आलेले भास्कर जाधव यावेळी देखील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज काहींना होता. भास्कर जाधव यांनीदेखील आपण ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ असा मोठा आत्मविश्वास व्यक्त केला होता.

मात्र प्रत्यक्षात हा त्यांचा अतिआत्मविश्वास असल्याचे या निकालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील जनतेला हवा असलेला बदल अवघ्या काही मतांनी हुकल्याची सल येथील जनतेत महायुतीच्या पराभवातून दिसून आली. अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राजेश बेंडल यांनी भास्कर जाधव यांचे मताधिक्य अवघ्या अडीच हजारावर आणले.  यावरूनच त्यांच्याबद्दल येथील मतदार व जनतेत असलेली नाराजी मतपेटीतून स्पष्टपणे समोर आली आहे. त्यामुळे या पराभवा देखील राजेश बेंडल यांचा आणि येथील जनतेचा नैतिक विजय झाल्याचे आता बोलले जात आहे. या निवडणुकीत भास्कर जाधव यांना ७२ हजार २४१, राजेश बेंडल यांना ६८ हजार ४११, मनसेचे प्रमोद गांधी यांना ६ हजार ७१२, अपक्ष सुनील जाधव यांना १ हजार ७६१, प्रमोद आंब्रे यांना ९६५, अपक्ष मोहन पवार यांना ७६७, अपक्ष सन्दीप फडकले यांना ४३३ तर  नोटाला १ हजार १९७ एवढी मते मिळाली.

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
influence of right wing ideology in the United States the European Union and some countries in Asia print exp
अमेरिका, इटली, हंगेरी, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया… प्रगत देशांतही उजव्या विचारांचा प्रभाव… मतैक्य कशावर? मतभेद कशाविषयी?
BJP vs Congress which political party has bigger bank balance
BJP vs Congress : भाजपा आणि काँग्रेस… दोन्ही पक्षांच्या बँक बॅलन्समध्ये नेमका फरक किती? निवडणूक आयोगाच्या डेटामधून समोर आली माहिती
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Congress MLAs praises of Haryana CM Saini
Congress : हरियाणा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? दोन आमदारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक

हेही वाचा >>> राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बिचुकलेंना आमदारही बनता येईना; बारामतीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का!

भास्कर जाधव यांचा निसटता विजय भाजपची साथ तोलामोलाची माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली येथिल भाजपने अतिशय नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत राजेश बेंडल यांना अधिकाधिक मताधिक्य मिळवुन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे या मतमोजणीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आगामी काळात भास्कर जाधव यांच्यासाठी हा निसटता विजय चिंतन करायला भाग पाडणारा आहे एवढे मात्र नक्की.

Story img Loader