Marathi News Highlights, 20 June 2025 : राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जात आहे. तसेच पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. यावर आता शरद पवार यांनी देखील भूमका मांडली आहे. तसेच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. या मेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील भाष्य करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंशी युतीचे संकेत दिले आहेत. यावर आता अनेक जण प्रतिक्रिया येत आहेत. तसेच राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

17:50 (IST) 20 Jun 2025

कल्याण अल्पवयीन मुलीचे बलात्कार आणि हत्या प्रकरण; साक्षी गवळीला जामीन मंजूर

कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात नराधम विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने काही महिन्यांपूर्वीच कारागृहात फाशी घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणात सहभागी असलेली विशाल याची पत्नी ही जेलमध्ये होती. तिने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने आज मंजूर केला.

16:43 (IST) 20 Jun 2025
वरंध घाट वाहतुकीसाठी बंद; प्रवाश्यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश

अलिबाग- पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा वंरध घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंदी असणार आहे. प्रवाश्यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वाचा सविस्तर

16:16 (IST) 20 Jun 2025

पालघर : सातिवली उड्डाणपुलावरून हलक्या वाहनांची हंगामी पद्धतीने वाहतूक सुरू

सातिवली येथील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण राहिल्याने पावसाळ्याच्या आरंभी सेवा रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले होते. ...अधिक वाचा
15:41 (IST) 20 Jun 2025

बोलबच्चन भैरवी असलेल्यांना उत्तर देत नाही…देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न केल्यास भाजपचे नामोनिशाण महाराष्ट्रातून मिटवून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यात दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही, अशी टीका ठाकरे यांचे नाव न घेता केली.

वाचा सविस्तर

14:48 (IST) 20 Jun 2025

कल्याण पूर्व-उल्हासनगर जोडणारा उड्डाण पूल खचल्याने वाहतुकीसाठी बंद

ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी सांगितले, पुलाच्या खचलेल्या भागाखालून बाजुला असलेल्या एका गॅस कंपनीची वाहिनी गेली आहे. ...अधिक वाचा
14:26 (IST) 20 Jun 2025

‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ : दैनंदिन प्रवासी संख्येचा बुधवारी विक्रम; तब्बल २ लाख ९३ हजार ६९१ प्रवाशांनी केला प्रवास

सुरुवातीला असलेली प्रतिदिन ३० हजार प्रवासी संख्या आता थेट २ लाख ६० हजारांवर पोहोचली आहे. ...वाचा सविस्तर
14:17 (IST) 20 Jun 2025

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रुग्णालयात दाखल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बाबत अस्वस्थता वाटत होती. ...सविस्तर वाचा
14:05 (IST) 20 Jun 2025

पावसाळ्यात वीज खंडित कालावधी कमी ठेवा, महावितरणच्या बैठकीत निर्देश

मान्सून सक्रिय झाला असून पावसाळ्यात ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्यासह ग्राहक आणि कर्मचारी यांच्या विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. - महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र ...वाचा सविस्तर
13:56 (IST) 20 Jun 2025

जेएनपीए विस्थापितांचा पुनर्वसनासाठी लढा; उच्च न्यायालयात याचिका दाखल, ३८ वर्षांपासून पाठपुरावा

जिल्हाधिकारी, राज्याचे पुनर्वसनमंत्री, केंद्रीय जहाज मंत्री,जेएनपीए यांच्याशी पत्रव्यवहार, चर्चा, बैठका, आंदोलने, मोर्चे अशा प्रदीर्घ संघर्षानंतरही गावकऱ्यांना जेएनपीएसह केंद्र, राज्य सरकारकडून फक्त आश्वासनेच मिळाली आहेत. ...सविस्तर बातमी
13:55 (IST) 20 Jun 2025

"राज ठाकरेंच्या मनात जे आहे, तेच...", बाळा नांदगावकर यांचं मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत भाष्य

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना म्हटलं की, "राज ठाकरे यांच्या मनात जे आहे तेच माझ्या मनात आहे. राजकारणात चांगलं वाईट घडत असतं. त्यामुळे युतीबाबत काय होईल हे मला माहिती नाही. मी राज ठाकरे यांना हेच विचारलं की युतीबाबत तुमच्या मनात काय चाललंय? पण मला आणखी उत्तर मिळालं नाही, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

13:54 (IST) 20 Jun 2025

मुसळधार पावसाने नाशिकच्या गंगापूर धरणाचे दरवाजे जूनमध्येच उघडले; दारणा, कडवा, पालखेडमधूनही विसर्ग

गंगापूर धरणात ३६८१ दशलक्ष घनफूट म्हणजे ६५ टक्क्यांहून अधिक जलसाठा झाल्यामुळे या हंगामात पहिल्यांदा शुक्रवारी सकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. ...अधिक वाचा
13:41 (IST) 20 Jun 2025

कल्याणमध्ये तिसगाव येथे वृत्तपत्र विक्रेता महिलेच्या सोन्याच्या ऐवजाची चोरी

वंदना सुदाम उघडे (४५) असे या वृतपत्र विक्रेता महिलेचे नाव आहे. ...सविस्तर वाचा
13:37 (IST) 20 Jun 2025

जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर नाट्य… काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षाचा आत्मदहनाचा प्रयत्न

धरणगाव येथील क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ...वाचा सविस्तर
13:32 (IST) 20 Jun 2025

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना मिळणार गुगलचे बळ

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा प्रयत्नशील आहेत. ...वाचा सविस्तर
13:26 (IST) 20 Jun 2025

पावसामुळे तुर्भे रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात तुंबले पाणी; प्रवाशांचे हाल, प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजना

या भुयारी मार्गाशेजारीच ड्रेनेज लाईन असल्याने गटारे तुंबली की साचलेले सांडपाणी रस्त्यावर पसरते. त्यामुळे दुर्गंधी व घाण पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...सविस्तर बातमी
13:23 (IST) 20 Jun 2025

मुंबई : घाटकोपरमध्ये आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास एक इसम गंभीर अवस्थेत  रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर असल्याची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाली. ...अधिक वाचा
13:21 (IST) 20 Jun 2025

बोलबच्चन भैरवी असलेल्यांना उत्तर देत नाही…देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

ठाकरे यांच्या टिकेला उत्तर देताना शुक्रवारी जळगाव येथे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलबच्चन भैरवी अशी उपाधी दिली. अशांना मी उत्तर देत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. ...अधिक वाचा
13:13 (IST) 20 Jun 2025

अकोला : मोर्णा, विद्रुपा नदीच्या पूररेषेचे नव्याने सर्वेक्षण; नदीकाठच्या लाखो नागरिकांना…

मोर्णा नदीला पूर आल्यामुळे शहरातील नागरिकांना अनेकवेळा त्याचा फटका बसला आहे. नदी काठच्या घरात आठ ते नऊ फुटापर्यंत पाणी साचले होते. ...अधिक वाचा
12:47 (IST) 20 Jun 2025

९३ वर्षांपासून नगर परिषद 'अध्यक्ष' पदापासून अनुसूचित जमाती प्रवर्ग वंचित!

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अध्यक्षपदाचे आरक्षण मिळावे म्हणून 'ट्रायबल फोरम' या संघटनेने राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन पाठविण्यात आले. ...सविस्तर वाचा
12:02 (IST) 20 Jun 2025

डेटींग ॲपवरून डॉक्टरचा लैंगिक छळ, बळजबरीने गर्भपात आणि फोटो वायरल करण्याची धमकी

तिची ओळख मुंबईतील डोंगरी येथे राहणाऱ्या खालिद खानयारी (२७) याच्याशी झाली. ...सविस्तर बातमी
11:42 (IST) 20 Jun 2025

"टोरंट पॉवरने सुरक्षा ठेव भरण्यास सांगितले तर मला सांगा", खासदार बाळ्या मामा

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे आहेत. या मतदारसंघातील भिवंडी शहरामध्ये आणि काही ग्रामीण भागात वीज वितरण टोरंट कंपनीकडून केला जातो. ...सविस्तर बातमी
11:28 (IST) 20 Jun 2025

वसईत जलतरण तलावाचे काम धीम्या गतीने , जलतरणपटुंची गैरसोय

वसई विरार महानगरपालिकेने जलतरणपटू आणि शहरातील नागरिकांसाठी पोहण्यासाठी नवघर येथे जलतरण तलाव तयार केले आहे. ...अधिक वाचा
11:13 (IST) 20 Jun 2025

शहरी नक्षलवाद प्रकरण : गौतम नवलखा यांना दिल्लीत राहण्यास परवानगी नाकारली

नवलखा यांना मे २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ...अधिक वाचा
10:55 (IST) 20 Jun 2025

ठेकेदारीतून बडगुजर यांचा उत्कर्ष

शिवसेनेच्या ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी. ...सविस्तर वाचा
10:54 (IST) 20 Jun 2025

"दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजपाची तडफड", संजय राऊत यांची टीका

"शिवसेना ठाकरे गटाने कोणाबरोबर युती करावी? हा आमचा प्रश्न आहे. मग तुम्ही कोण आहात? बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला का आणता? या अब्दुल्लाचा काय संबंध? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत. दोन्ही पक्ष एका विचारधारेचे आहेत. मग ते दोघे ठरवतील. महाराष्ट्रातील जनता ठरवेल, तुमचा एवढा तिळपापड का झालाय? तुमची अघोरी विद्या कामाला येत नाही का? तुमचे गुवाहाटीतील रेडे तुम्हाला यश प्राप्त करू देत नाहीत का? आमचं आम्ही पाहू ना, तुमची फडणवीसांनी काय आवस्था केली आहे ते पाहा, तुमचं पायपुसणं केलं आहे. तुमची काय आवस्था झाली आहे हे आम्हाला माहिती आहे", असं म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

10:40 (IST) 20 Jun 2025

भाईंदर : यंदा सुक्या बोंबलाची बोंब! बाजारातून सुकी मासळी गायब

भाईंदर पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यावर वर्षानुवर्षे मासेमारी करणारे मच्छीमार सध्या सुक्या मासळीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आले आहेत. ...अधिक वाचा
10:31 (IST) 20 Jun 2025

'हिंदीकडे दुर्लक्ष नको पण सक्तीही अयोग्य'; शरद पवारांची स्पष्ट भूमिका

"सक्ती असू नये. पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताचं नाही. पण सक्ती असू नये. ज्याला जे हवंय, ते त्यानं करावं. विद्यार्थ्याच्या पालकांनी जे काही मार्गदर्शन केलं असेल विद्यार्थ्याला, त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यावा. कुणी स्वत:हून शिकत असेल, तर नाही म्हणण्याचं कारण नाही. संपूर्ण देशाच्या लोकसंख्येपैकी ५५ ते ६० टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. पण सक्ती करणं योग्य नाही", असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

10:31 (IST) 20 Jun 2025

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं विधान

"आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले की, यावर अद्याप चर्चा झालेली नाही. पण आमच्या सर्वांमध्ये मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावं लागेल", असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Maharashtra Live News Updates in Marathi

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं विधान, (फोटो-संग्रहित छायाचित्र)