Maharashtra Live News Updates, 22 July : विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा कथित व्हिडिओ प्रत्येकाच्या फोनवर दिसत आहे. यावरून कोकाटेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशातच माणिकराव कोकाटे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. कोकाटे आज राजीनाम्याची घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेकडे व संबंधित घडामोडींकडे आपलं लक्ष असेल.

दरम्यान, हनी ट्रॅप प्रकरणावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी प्रफुल्ल लोढाच्या अटकेची मागणी होत आहे. तसेच, मंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन हे सदर हनी ट्रॅप मंडळाचे अध्यक्ष असल्याची टीका शिवसेनेने (ठाकरे) ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून केली आहे. या हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, गिरीश महाजन व एकनाथ खडसेंमधील संघर्ष, फडणवीस व अजित पवारांचा वाढदिवस, राज्य सरकारचं त्रिभाषा सूत्र, त्यावरील केंद्राची प्रतिक्रिया, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात आज होणारी सुनावणी, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेला संभ्रम यासह राज्यातील सर्व राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.

Live Updates

महाराष्ट्र आणि देशभरातील राजकीय तथा सामाजिक बातम्यांचा आढावा.

18:13 (IST) 22 Jul 2025

ठाणे : शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायच्या का? देयके मिळत नसल्यामुळे ठेकेदारांचा सवाल

ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राटदारांनी कामे केली आहेत. मात्र, त्यांना अद्याप त्यांची देयके देण्यात आलेली नाहीत. ...सविस्तर बातमी
18:00 (IST) 22 Jul 2025

ठाणे महापालिकेवर मुंब्य्राचा कचरा फेकण्यासाठी वाहने निघाली पण, पोलिसांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना रोखले अन्…

ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या सातत्याने निर्माण होत आहे. ठाणे महापालिकेकडे कचराभुमीसाठी स्वत:ची जागा नव्हती. ...अधिक वाचा
17:53 (IST) 22 Jul 2025

प्रशासकीय घोळात शिक्षकांचे वेतन रखडले, उल्हासनगर पालिकेतील नियुक्तांच्या घोळाचा फटका

राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात राज्यात प्रथम येत उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी वाहवाह मिळवली होती. ...सविस्तर बातमी
17:43 (IST) 22 Jul 2025

कडोंमपा शाळेतील ओस पडलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या फर्निचरवर लाखोची उधळपट्टी

या केंद्रावर लाखो रूपयांची उधळपट्टी करून अधिकाऱ्यांनी मात्र चंगळ करून घेतली असल्याची चर्चा आहे. ...सविस्तर बातमी
17:09 (IST) 22 Jul 2025

ठाण्यात बासरी स्वर गुंजणार, पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची उपस्थिती

भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपणारी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणारी गुरुकुल प्रतिष्ठान ही संस्था ही विविध सांगितीक कार्यक्रमांचे आयोजन करित असते. ...अधिक वाचा
16:37 (IST) 22 Jul 2025

अधिकच्या परताव्याचे मोह, महिलेने ३१ लाख गमावले; शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावे ऑनलाईन फसवणूक

गेल्या काही वर्षात बदलापूर आणि अंबरनाथसारख्या नोकरदार वर्गाच्या शहरातही उच्च शिक्षितांमध्ये अशा फसवणुक झालेल्यांची संख्या अधिक आहे. ...सविस्तर बातमी
16:36 (IST) 22 Jul 2025

कल्याणमध्ये नांदिवलीतील रुग्णालयात स्वागतिकेला तरूणाची बेदम मारहाण

रुग्णालयातील स्वागतिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोकुळ झा विरुध्द गु्न्हा दाखल केला आहे. ...सविस्तर बातमी
16:18 (IST) 22 Jul 2025

धर्मापलीकडच्या पर्यावरणाचा 'श्रीगणेशा', मुस्लिम बहुल शाळांमध्येही 'साकारतोय बाप्पा'

मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या ठिकाणी गणेशोत्सव अधिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्याचे प्रमाण हे अधिक आहे. ...सविस्तर वाचा
15:43 (IST) 22 Jul 2025

अंबरनाथमध्ये उभा राहणार जिल्हा परिषदेचा पहिला मॉल, महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ

ठाणे जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यामतून बचत गटाची चळवळ उभी केली आहे. या चळवळीच्या माध्यमातून महिलांचा घराला आर्थिकदृष्ट्या हातभार लागत आहे. ...अधिक वाचा
15:35 (IST) 22 Jul 2025

माणिकराव कोकाटे यांच्यावर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून पत्ते फेकण्याचा प्रयत्न

मंगळवारी कोकाटे हे नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांच्यावर शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) काही कार्यकर्त्यांकडून पत्ते फेकण्याचा प्रयत्न झाला. नाशिकरोड पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...वाचा सविस्तर
15:23 (IST) 22 Jul 2025

डोंबिवली जवळील गोळवलीत बेकायदा बांधकाम करणाऱ्या नऊ जणांवर ‘एमआरटीपी’चा गुन्हा

डोंबिवली जवळील कल्याण शीळ रस्त्यावरील गोळवली गाव हद्दीत एक भूमाफिया आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे. ...सविस्तर वाचा
15:14 (IST) 22 Jul 2025

आई व पत्नीच्या नावाने डान्सबार काढून बायका नाचवता, लाज वाटत नाही का? अनिल परबांचा गृहराज्यमंत्र्यांवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. त्यावर कारवाई कोण करणार? अशाप्रकारे डान्सबारमध्ये पोरी नाचवून अश्लीलता पसरावायला लाज वाटत नाही का, असा सवाल शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. परब यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद बोलावली होती. यावळी त्यांनी कांदिवली येथील कदम कुटुंबीयांची मालकी असलेल्या 'सावली' या बारचा मुद्दा पुन्हा उचलून धरला.

14:47 (IST) 22 Jul 2025

बारा दिवसानंतर संस्थाचालक दाम्पत्याला पोलिसांकडून अटक; मारहाणीत पालकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्सी या बहुचर्चित व वादग्रस्त निवासी शाळेचा संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांना अखेर पोलिसांनी आज मंगळवारी (दि.२२)पहाटे अटक केली. ...सविस्तर बातमी
14:00 (IST) 22 Jul 2025

ठाणे: उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानास प्रतिसाद, पहिल्याच दिवशी २७९ महिलांनी केली आरोग्य तपासणी

कुटुंब प्रमुख असलेल्या महिलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबविले होते. ...अधिक वाचा
13:41 (IST) 22 Jul 2025

चव्हाण गटाचे हनमंतराव बेटमोगरेकर नांदेड बँकेचे नवे उपाध्यक्ष !

बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी सकाळी ११.०० वाजता उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बेटमोगरेकर यांनी दोन अर्ज भरले. ...सविस्तर बातमी
13:27 (IST) 22 Jul 2025

तरुणीला आंटी म्हणाला म्हणून भाजीविक्रेत्याला बेदम मारहाण, ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट भागातील घटना

हिरानंदानी इस्टेट भागात २९ वर्षीय भाजी विक्रेत्याचे दुकान आहे. परिसरातील काही सदनिकाधारक त्याला व्हाॅट्स ॲपवर संदेश पाठवून त्याच्याकडून भाजी खरेदी करतात. ...अधिक वाचा
13:24 (IST) 22 Jul 2025

वाल्मीक कराडचा दोष मुक्ती अर्ज न्यायालयाने फेटाळला

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव असलेला वाल्मीक कराड याने यापूर्वीच्या काही सुनावणी वेळी आपल्याला दोष मुक्त करावे असा अर्ज आज बीड जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. ...सविस्तर वाचा
13:07 (IST) 22 Jul 2025

मुंबई: जोगेश्वरीमध्ये कावड यात्रेवर अंडी फेकली, भाविकांमध्ये संताप

जोगेश्वरीत विश्व हिंदू परिषद आणि श्री खांडेश्वर महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक समतरसता नावाने कावड यात्रा काढण्यात आली होती. ...सविस्तर बातमी
12:57 (IST) 22 Jul 2025

"सत्य बाहेर आणावं लागतंय" म्हणत रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे दोन VIDEO केले शेअर

Rohit Pawar vs Manikrao Kokate : रोहित पवार म्हणाले, "सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं वक्तव्य धडधडीत खोटं आहे. सभागृहात तेव्हा आदिवासी बांधवांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा चालू होती. ...सविस्तर वाचा
12:54 (IST) 22 Jul 2025

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा मागणारे भाजप आमदार आशीष देशमुख यांचा बोलवता धनी कोण ?

कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराने करावी, हे अनाकलनीय आहे. ...सविस्तर वाचा
12:25 (IST) 22 Jul 2025

अजितदादांचे २१ वर्षांपूर्वी हुकले मुख्यमंत्रीपद; जळगावमधील पदाधिकाऱ्यांना त्याची अजुनही खदखद…

२००४ च्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्यानंतर अजितदादांना मुख्यमंत्री होण्याची आशा होती. या सर्व आठवणी अजितदादांच्या वाढदिवशी ताज्या करत जळगावमधील त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली आहे. ...सविस्तर बातमी
11:33 (IST) 22 Jul 2025

नंदुरबार जिल्ह्यात १२ शासकीय आश्रमशाळांमध्ये सौर वीज प्रकल्पात गैरव्यवहार; तपासणी करण्याचा निर्णय

तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये सौर सयंत्र बसविण्याच्या योजनेला फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आदिवासी विकास विभाग ही योजना सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाकडून राबवून घेत आहे. ...अधिक वाचा
11:17 (IST) 22 Jul 2025

Manikrao Kokate: "मुख्यमंत्र्यांनी मीडियावर विश्वास ठेऊन…", देवेंद्र फडणवीसांच्या रमीबाबतच्या वक्तव्यावर कोकाटेंची प्रतिक्रिया

Manikrao Kokate Rummy Video: पत्रकार परिषदेत बोलताना कोकाटे म्हणाले की, "बरोबर आहे. मी मुख्यमंत्र्यांशी अद्याप या विषयावर बोललो नाही. मी याबाबत त्यांना माहिती दिली नाही आणि चौकशीही झाली नाही." ...अधिक वाचा
11:06 (IST) 22 Jul 2025

…तर नागपूर अधिवेशनात मंत्रिपदाचा राजीनामा देईन : माणिकराव कोकाटे

माणिकराव कोकाटे म्हणाले, "मी सभागृहात रमी खेळलो असं वाटत असेल तर याप्रकरणी तपास करावा. मी यामध्ये दोषी आढळलो आणि त्यानंतर मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी येणाऱ्या नागपूर अधिवेशनात (हिवाळी) यावर निवेदन दिलं. तर मी थेट राज्यपालांकडे जाऊन माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करेन."

11:01 (IST) 22 Jul 2025

"…तर नागपूर अधिवेशनात मंत्रिपदाचा राजीनामा देईन", विधीमंडळातील रमीच्या डावावर माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण

Manikrao Kokate Statement on Rummy Video : विधीमंडळाच्या सभागृहातील कथित ऑनलाइन रमीच्या डावावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे म्हणाले की "मी रमी खेळत नव्हतो." ...सविस्तर वाचा
10:59 (IST) 22 Jul 2025

मुंबई : विमानात धूम्रपान, प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल

नियमानुसार विमान सुरू होण्याआधी आणि विमान सुरू असताना विमानात धूम्रपान करण्यास बंदी आहे. तशी माहिती प्रवाशांना वेळोवेळी दिली जाते. ...सविस्तर वाचा
09:42 (IST) 22 Jul 2025
माणिकराव कोकाटेंची आज पत्रकार परिषद

कृषमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनाच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर राज्यात त्यांच्याविरोधात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटेंच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ती कृती उचित नसल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे आज सकाळी १० वाजता नाशिक येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते काही मोठी घोषणा करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.