Marathi News Updates, 23 June 2025 : राज्यात सरकारकडून प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांवर अप्रत्यक्षपणे हिंदी भाषा शिकण्याची सक्ती केली जात आहे. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (ठाकरे) आक्रमक झाली आहे. मनसे आज (२३ जून) मुंबईत मोर्चा काढणार असून, सरकारच्या निर्णयाविरोधात स्वाक्षरी मोहीमही राबवणार आहे. दुसऱ्या बाजूला, हिंदी भाषेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाची बैठक घेणार असून दोन्ही उपमुख्यमंत्री व राज्याचे सचिव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याविषयीच्या सर्व बातम्यांचे अपडेट्स आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
दरम्यान, शिवसेनेतील (ठाकरे) नेत्यांमध्ये आलबेल नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पक्षातील प्रमुख नेते व आमदार भास्कर जाधव आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यात वाद असल्याची चर्चा चालू आहे. “भाषण करायला मिळालंच पाहिजे अशी हवा माझ्या डोक्यात कधी गेली नाही. जी हुजुरी करायला मी कुठे गेलो नाही”, असं म्हणत जाधव यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तसेच जाधवांच्या राजकीय सन्यांसाची देखील चर्चा रंगत आहे. मात्र, उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांच्या वक्तव्याची दखल घेतील असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल.
Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय व सामाजिक घडामोडी वाचा एकाच क्लिकवर.
दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून… किती विद्यार्थ्यांनी केली नोंदणी?
केंद्रीय मंत्री बसले बैलगाडीत…विद्यार्थ्यांनाही बसवले आणि……
एमपीएससीचा ऐतिहासिक निर्णय: भरती प्रक्रियेकरिता पर्सेंटाईल पद्धती लागू
पालखी सोहळ्यावेळी ‘एआय’च्या साह्याने गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन!
बुलढाणा: मेरा खुर्दमध्ये युवकाची भर चौकात निर्घृण हत्या ! कोयत्याने वार
पिंपरी महापालिकेत आयटी पार्क समाविष्ट करा, आयटीयन्सची मागणी; हिंजवडी परिसरातील नागरी समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ
शिक्षणमंत्री दादा भुसे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज विदर्भातील शाळांचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करण्यासाठी दादा भुसे यांनी काही शाळांमध्ये हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले, पहिली ते पाचवीच्या मुलांना तिसरी भाषा शिकवण्यासंदर्भात जो शासन निर्णय घेतला आहे त्यामध्ये तिसऱ्या भाषेसंदर्भात कुठेही अनिर्वाय शब्द नाहीये. विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अपेक्षित असेल ती भाषा शिकवली जाईल. सगळं विद्यार्थी व पालकांवर सोपवलं आहे. पहिली दुसरीतील विद्यार्थ्यांना बडबड गीतांतून भाषा शिकवली जाते, ती खूप क्लिष्ट पद्धतीने शिकवली जात नाही. केंद्र शासनाच्या वतीने नॅशनल एजुकेशन पॉलिसी आणण्यात आली आहे. त्यानुसार आवश्यक ते शिक्षण मुलांना दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदेश देतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल, मराठी भाषेला कमी लेखणे हा आमचा उद्देश नाही. येणाऱ्या काळामध्ये शाळेमधील भौतिक सुधारणांचा विचार करत शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृह सोयी दिल्या जाणार.
जळगाव शहरातील कचरा उचलण्यास अखेर सुरूवात… ‘लोकसत्ता’ वृत्तामुळे प्रशासनास जाग
दादा भुसेंच्या उपस्थितीतील प्रवेशोत्सव ठरला वादग्रस्त! स्वागतापूर्वी विद्यार्थ्यांकडून सफाईची कामे, मंत्री म्हणाले, "कारवाई करू…"
सागरी महामार्गावरील काळबादेवी गावात पुल होणारच - पालकमंत्री उदय सामंत
संघाचे ठरले… तारीखही निघाली… स्वतः सरसंघचालक दिल्लीच्या ‘केशवकुंज’ मध्ये…
पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं, भाजपा खासदार मेधा कुलकर्णींची मागणी
विधीमंडळात संसदीय अंदाज समितीच्या ७५ व्या वर्धापन दिन संपन्न
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदीय अंदाज समितीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त 'कमिटी ऑन एस्टिमेट्स, पार्लमेंट ऑफ इंडिया (1950-2025)' या स्मरणिकेचे प्रकाशन केले.
विधीमंडळातील कार्यक्रमाचा फलक पाहून संदीप देशपांडे संतप्त; म्हणाले, "तिथे सगळे षंढ बसलेत"
सरकारी शाळांत किलबिलाट, खासगी शाळांत शुकशुकाट…
जळगावहून मुंबईला फक्त पाच तासांत पोहोचता येणार … समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली
आयआयटीचा विद्यार्थी, अपघाताने शेतीत आणि भरघोस उत्पन्न; आता म्हणतो…
नितीन गडकरी पुन्हा स्पष्टच बोलले, "माझ्या मुलांसाठी तिकीट मागत नसल्याने पक्षातील अनेकांची अडचण…"
सत्तेची पाच वर्षे संपत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का? फडणवीसांच्या वक्तव्यावर अनिल देशमुखांचा सवाल
राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र, अवकाळी व त्यानंतर मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे. मात्र महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द आता फिरवलाय अशी टीका होत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, मी कर्जमाफीबाबत सविस्तर सांगितलं आहे, कर्जमाफी कधी करायची याचे काही नियम आहेत. त्याची एक पद्धत आहे, या सरकारनं दिलेला एकही शब्द फिरवत नाही, योग्य वेळी कर्जमाफी निर्णय घेतला जाईल. त्यावर माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार अनिल देशमुख म्हणाले, सत्तेची पाच वर्षे संपत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का?
जळगाव: अमळनेर रेल्वे स्थानकावरील मालधक्का प्रवाशांसाठी त्रासदायक
कर्जमाफी नाही, शेतमालास भाव नाही, नैसर्गिक आपत्तीत मदत नाही आणि आता पेरणीच्या हंगामात…
दोन ठाकरेंचं मनोमिलन होण्याआधीच मिठाचा खडा पडला? संदीप देशपांडे म्हणाले, "आम्ही पाय चाटले नाहीत"
चंद्रपूर : खरळपेठचा शेतकरी पुत्र चतुर्भुजम ‘‘भाभा’’त वैज्ञानिक
अधिकारक्षेत्र निश्चित करण्यासाठी वाघ काय करतात..?
अमरावतीनंतर अकोल्यातील विमानतळाचा प्रश्न मार्गी? मुख्यमंत्र्यांचा शब्द अन्…
महापौर हा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चाच - इद्रिस नायकवडी
भास्कर जाधव राजकीय संन्यास घेणार? ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत म्हणाले, "भास्कर जाधव हे आमचे सहकारी व शिवसेनेचे (ठाकरे) प्रमुख नेते आहेत. त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. ते चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या गेल्या काही काळात त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी नक्कीच खूप योगदान दिलं आहे. ते आम्हा सर्वांना प्रिय आहेत. त्यांची प्रतिक्रिया मी वृत्तपत्रांमध्ये वाचली आहे. त्यांनी आजवर पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या योग्यरित्या पेलवल्या आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात व कोकणात असतात. ते जेव्हा मुंबईत येतील तेव्हा आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतील. भास्कर जाधव हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्या मनात काय आहे ते आम्ही समजून घेऊ. त्यांच्या मनातील वेदना उद्धव ठाकरे समजून घेतील".