Marathwada Rain Live Updates: मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक फटका मराठवाड्यातील जिल्ह्यांना बसला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.

नुकसान किती झाले याची पाहणी करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज (बुधवारी) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

Live Updates

Marathi News Live Today | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

20:15 (IST) 24 Sep 2025

आता रानटी हत्तींना बेशुद्ध करण्याच्या पर्यायावर विचार, कायमस्वरूपी तोडग्यासाठी…

जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून जंगली हत्तींच्या हल्ल्यामुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील आहे. ...सविस्तर वाचा
20:12 (IST) 24 Sep 2025

पीकविमा योजना कुचकामी; सर्वपक्षीय आमदार आक्रमक, लोकप्रतिनिधींनी एकमुखी केली 'ही' मागणी

Maharashtra Crop Insurance Scheme : अतिवृष्टी किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा निकष रद्द केल्यामुळे सध्याच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा फारसा फायदा होणार नाही. ...अधिक वाचा
20:12 (IST) 24 Sep 2025

पीकविमा योजना कुचकामी; सर्वपक्षीय आमदार आक्रमक, लोकप्रतिनिधींनी एकमुखी केली 'ही' मागणी

Maharashtra Crop Insurance Scheme : अतिवृष्टी किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा निकष रद्द केल्यामुळे सध्याच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा फारसा फायदा होणार नाही. ...अधिक वाचा
20:03 (IST) 24 Sep 2025

नळ जोडणी खंडित होणार? सायबर भामट्यांचा नवा डाव; समाज माध्यमांवरील संदेशाने…

‘आज रात्रीपासून नळ जोडणी खंडित होणार’ असे बनावट व खोटे संदेश शहरातील नागरिकांना समाज माध्यमांवर पाठविण्यात येत आहेत. नळधारकांना लुटण्याचा सायबर भामट्यांनी हा नवा डाव टाकला आहे. ...सविस्तर बातमी
19:51 (IST) 24 Sep 2025

“पंतप्रधान बनण्यासाठी ‘देवाभाऊ’कडून वसुली?” बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांवर टीका

गरीब शेतकरी व सर्वसामान्यांची चाललेली ही लूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान बनवण्यासाठी तर नाही ना, अशी उपरोधीक टीका बच्चू कडू यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केली. ...सविस्तर वाचा
19:38 (IST) 24 Sep 2025

VIDEO : चक्क शासकीय जागेवरच थाटला देहव्यापार, सहा महिलांसह एक पुरुष…

शासकीय जागेवरच चक्क देहव्यापार थाटल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये उघडकीस आला आहे.अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने बनावट ग्राहक पाठवून कुंटणखान्यावर छापा टाकला. ...अधिक वाचा
19:34 (IST) 24 Sep 2025

देशाला १४० न्यायाधीश, हजारो वकील देणाऱ्या महाविद्यालयात सरन्यायाधीश भूषण गवई भेट देणार...

Chief Justice Bhushan Gavai : भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महाविद्यालयात संविधानातील उद्देशिका फलकाचे अनावरण न्या. गवई यांच्या हस्ते होणार आहे. ...वाचा सविस्तर
19:27 (IST) 24 Sep 2025

काश्मिरींनी शेजारी देशाला कधीही साथ दिली नाही; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन

काश्मिरी लोक शेजारील देशाबरोबर जाण्याचा कधीही विचार करणार नाहीत. त्यामुळे काश्मिरी जनतेसह तेथील मुस्लिमांसाठी सकारात्मक विचार झाला पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. ...अधिक वाचा
19:15 (IST) 24 Sep 2025

दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे पिंपरी-चिंचवड लक्ष्य, अजित पवारांच्या जनसंवाद; शरद पवार यांच्याकडून पदाधिकाऱ्यांशी संवाद

भाजपने वर्चस्व निर्माण केलेला एकेकाळचा पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा काबीज करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. ...सविस्तर वाचा
19:01 (IST) 24 Sep 2025

‘जनसंवाद’ पक्षाचा की पालकमंत्री अजित पवारांचा? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल

उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये घेतलेला जनसंवाद पक्षाचा होता की पालकमंत्र्यांचा'? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. ...अधिक वाचा
19:01 (IST) 24 Sep 2025

‘जनसंवाद’ पक्षाचा की पालकमंत्री अजित पवारांचा? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल

उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये घेतलेला जनसंवाद पक्षाचा होता की पालकमंत्र्यांचा'? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. ...अधिक वाचा
18:50 (IST) 24 Sep 2025

७६ वर्षीय गुराख्याची वाघाशी झुंज, केवळ काठीच्या आधाराने…

खांदला गावातील शिवराम गोसाई बामनकर यांनी जनावरांना चरण्यास सोडलेली असताना अचानक एका वाघाने झाडाझुडपातून झेप घेत त्यांच्यावर हल्ला चढवला ७६ वर्षीय गुराख्याने झुंज देऊन वाघाला पळवून लावले ...वाचा सविस्तर
18:43 (IST) 24 Sep 2025

ठाणे जिल्ह्यात माझ्या श्रेणीचा नेता नाही - गणेश नाईक

आपल्याला खुर्ची, सत्ता , पैसा, पॉवर इत्यादी बाबींचा मोह नसून ठाणे जिल्ह्यात आपल्या श्रेणीचा (रेंज) नेता नसल्याचे त्यांनी सांगत पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध अप्रत्यक्षपणे तोफ डागली. ...सविस्तर बातमी
18:38 (IST) 24 Sep 2025

शिवसेनेच्या मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेने मोठा मदतीचा हात दिला आहे. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे तसेच आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे. नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे

18:37 (IST) 24 Sep 2025

आदिवासींच्या जमिनी भाडे तत्त्वावर दिल्यास… माजी मंत्री वसंतराव पुरके आक्रमक

महाराष्ट्र सरकारकडून आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींना भाडे तत्वावर देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा प्रस्तावाची माहिती समोर येताच आंदोलन करण्याचा इशारा वसंत पुरके यांनी आज बुधवारी येथे दिला. ...सविस्तर बातमी
18:18 (IST) 24 Sep 2025

Pune Airport Gun Seized: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणीत महिलेच्या पिशवीत पिस्तूल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मंगळवारी रात्री पुणे विमानतळावरून दिल्लीला जाणार होती. ...सविस्तर बातमी
18:08 (IST) 24 Sep 2025

Pune Municipal Election: पुणे : निवडणुकीसाठी महापालिकेकडून २३ विशेष कक्ष

महापालिकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनांबाबत आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणी घेऊन याबाबतचा अहवाल सनदी अधिकारी व्ही. राधा यांनी नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. ...सविस्तर वाचा
18:07 (IST) 24 Sep 2025

Online Scam: पिंपरीत ऑनलाइन फसवणुकीच्या सहा घटना; एक कोटी ७१ लाख रुपयांना गंडा

ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चिंचवडमधील एका व्यक्तीची ३३ लाख १२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ...अधिक वाचा
17:59 (IST) 24 Sep 2025

गडचिरोली : सहा जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६२ लाखांचे बक्षीस…

पोलिसांच्या प्रभावी नक्षलवादविरोधी मोहिमेला बुधवारी आणखी एक मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्यासमोर ६ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. ...सविस्तर बातमी
17:54 (IST) 24 Sep 2025

Navratri Coconut Demand: नवरात्रोत्सवात नारळ महाग; दररोज तीन लाख नारळांची विक्री

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात नारळाला उच्चांकी मागणी असते. गेल्या दोन महिन्यांपासून नारळाचे दर तेजीत आहेत. ...सविस्तर बातमी
17:25 (IST) 24 Sep 2025

लॉजवर सुरू होता देहव्यवसाय; बनावट ग्राहकाने…

भंडारा तुमसर तालुक्यातील एका देह व्यापार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी कारवाई केल्याची घटना ताजी असताना आज पवनी तालुक्यातील एका लॉजवर सुरू असलेल्या देहव्यवसायावर पोलिसांनी धाड टाकली. ...वाचा सविस्तर
17:15 (IST) 24 Sep 2025

Video: पोषण आहारासाठी बालकां सह पालक यांचे पंचायत समितीत मध्येच…

इगतपूरी तालुक्यातील कुरुंगवाडीजवळील मारुतीवाडी येथे ३० पेक्षा जास्त आदिवासी कुटूंब राहतात. याठिकाणी मूलभूत सुविधा नाहीत. अंगणवाडीही नाही. ...सविस्तर वाचा
17:10 (IST) 24 Sep 2025

उड्डाणपुलाचा प्रश्न गंभीर! रेल्वे वाहतूक थांबवण्याची वेळ येणार का?, जिल्हाधिकाऱ्यांचे…

शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाखालील वाहतूक धोकादायक असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. ...सविस्तर बातमी
16:55 (IST) 24 Sep 2025

नागपुरातील पोलीस बिल्डिंग आणि वसाहत बाॅम्बने उडवणार… मदत कक्षाला फोन अन्…

नागपुरातील पोलीस मदत कक्षाला एक फोन आला. त्यात काटोल पोलीस बिल्डिंग,नागपुरातील ग्रामीण पोलीस वसाहत बाॅम्बने उडवून देण्याची धमकी दिली गेली. ...सविस्तर बातमी
16:43 (IST) 24 Sep 2025

राज्य शासनाला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जातवैधता पडताळणीचे अधिकार नाही, उच्च न्यायालयात…

राज्य शासनाला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जातवैधता पडताळणीचे अधिकार नाही, अशा आशयाची याचिका त्यांनी उच्च न्यायालयात केली आहे. ...सविस्तर वाचा
16:37 (IST) 24 Sep 2025

परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार; पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रणाली आणखी तीव्र !

Maharashtra Monsoon Retreat : हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर त्याचे परिणाम दिसून येत आहे. ...अधिक वाचा
16:32 (IST) 24 Sep 2025

बच्चू कडू कडाडले, 'शेतमालाला योग्य भाव द्या, अन्यथा नेपाळसारखे…' आठ वर्ष लूट केल्यावर जीएसटी कमी

‘शेतकऱ्यांची लूट थांबवा’ आणि ‘सातबारा कोरा करा’ अन्यथा नेपाळ सारखे घरात घुसू असा इशारा शेतकरी नेते बच्चू कडू यांनी खांबाडा येथील शेतकरी आंदोलनात दिला ...सविस्तर बातमी
16:16 (IST) 24 Sep 2025

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाची झडप…

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ बिट परिसरात शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. हल्ल्यात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...सविस्तर वाचा
16:05 (IST) 24 Sep 2025

निम्न पैनगंगा धरण विरोधी लढाई पुन्हा जोमाने सुरू करणार; शेतकऱ्यांचा एकमताने निर्णय

विदर्भ- मराठवाडा धरण विरोधी संघर्ष समितीने घेतलेल्या बैठकीत निम्न पैनगंगा धरण विरोधी लढा पुन्हा जोमाने सुरू करण्याचा निर्धार केला. ...सविस्तर वाचा
15:54 (IST) 24 Sep 2025

संतप्त शिवसैनिकांनी कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात फेकले कुजलेले सोयाबीन, मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा…

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाने आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात आक्रमक आंदोलन केले. ...सविस्तर बातमी

Ajit Pawar on Flood Relief

अजित पवार सध्या पूरग्रस्त गावांना भेटी देत आहेत. (PC : Ajit Pawar/FB)