Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू आहेत. अनेक नेत्यांचे विविध भागात दौरे सुरू आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं, त्यामुळे मोदींच्या दौऱ्यात काही महत्वाचे निर्णय होणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधक जोरदार टीका करत असून गृहराज्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, याच मुद्यांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या बरोबरच लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१०.३० कोटींचा निधी वळता करण्यात आला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना लवकरच सप्टेंबर महिन्याचा निधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Mumbai News Live Updates : राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

20:57 (IST) 9 Oct 2025

सिंगापूरविरुद्ध भारताची बरोबरी

भारतीय फुटबॉल संघाला सिंगापूरविरुद्धच्या आशिया चषक पात्रता सामन्यात १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ...वाचा सविस्तर
20:57 (IST) 9 Oct 2025

MSEB Strike : संपाच्या पहिल्या दिवशी पुण्यात काय झाले ?

आकुर्डी, शिवाजीनगर, कोथरूड, नगर रस्ता परिसर, येवलेवाडी परिसरातील वीज पुरवठा काही काळ विस्कळीत झाला होता. ...अधिक वाचा
20:56 (IST) 9 Oct 2025

Mumbai Local Train Block : कर्जत-खोपोली लोकल सेवा रद्द

गेल्या दोन आठवड्यापासून कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येत आहेत. ...सविस्तर बातमी
20:47 (IST) 9 Oct 2025

इ-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना

आता राज्यातील इ-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. ...सविस्तर वाचा
20:41 (IST) 9 Oct 2025

संभाजीनगर ते दिल्लीदरम्यान दोन विमानफेऱ्यांना ‘ग्रीन सिग्नल’, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुरावा

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय विमान वाहतुकमंत्री किंजरापू नायडु यांच्याकडे यासंदर्भात मागणी व पाठपुरावा केला. याला मंजुरी मिळाली असून ही विमान सेवा २६ ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत रुजू होत आहे. ...सविस्तर वाचा
20:40 (IST) 9 Oct 2025

अजित पवारांना मुरलीधर मोहोळांचे आव्हान? महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक जाहीर झाल्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. पहिल्यांदा मतदानास पात्र संघटनेच्या नावावरून संघर्ष निर्माण झाला. ...सविस्तर वाचा
20:32 (IST) 9 Oct 2025

ओल्या दुष्काळाबाबत पालकमंत्र्यांचे गंभीर विधान; म्हणाले, “ही बाब…”

दुष्काळाच्या मदतीसंदर्भात डॉ. भोयर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळेस आमदार राजेश बकाने, आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते व सेनेचे राजेश सराफ उपस्थित होते. ...वाचा सविस्तर
20:24 (IST) 9 Oct 2025

काही तासांतच ३२ हजारांहून अधिक नागरिकांनी ‘मुंबई वन’ ॲप केले डाऊनलोड; पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मेट्रो, मोनोसह त्या त्या परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करतात. प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट घ्यावे लागते. ...वाचा सविस्तर
20:08 (IST) 9 Oct 2025

राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरणदृष्ट्या संवदेनशील क्षेत्र आराखड्याला स्थगिती द्या; स्थानिक आदिवासींची मागणी

राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून १०० मीटर ते चार किलोमीटरदरम्यानच्या परिसरात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा आराखडा तयार केला आहे. या आरखड्यावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी मुंबई महापालिकेने ३० दिवसांची मुदत दिली होती. त्याची मुदत गुरुवारी संपुष्टात आली. ...सविस्तर वाचा
20:02 (IST) 9 Oct 2025

मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक १२ नोव्हेंबरला

एमसीएने पदाधिकारी, कार्यकारी परिषद सदस्य आणि ट्वेन्टी-२० मुंबई लीगच्या कार्यकारी परिषदेसाठीची निवडणूक १२ नोव्हेंबरला होणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. ...अधिक वाचा
20:01 (IST) 9 Oct 2025

पाणीटंचाईमुळे रहिवासी हैराण…पालिकेच्या एल विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा

कुर्ल्यातील अनेक भागांमधील नागरिक वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही या भागांमध्ये पुरेसे पाणी पुरविण्यात महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. ...सविस्तर बातमी
19:58 (IST) 9 Oct 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द, जातीवाचक शिवीगाळ; काही विद्यार्थ्यांची हकालपट्टी, कुलगुरू म्हणतात…

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ प्रशासनातील वाद, विद्यार्थ्यांची भांडणे, वैचारिक मतभेद अशा व अन्य स्वरूपात हे विद्यापीठ गाजत आले आहे. ...सविस्तर बातमी
19:43 (IST) 9 Oct 2025

६६ टक्के वीज कर्मचारी संपावर; वीज यंत्रणेत…

खासगीकरण व इतर प्रलंबित विषयांवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ०९ ऑक्टोबरपासून तीन दिवसाचा संप कृती समितीने पुकारला आहे. ...अधिक वाचा
19:42 (IST) 9 Oct 2025

अबब! सणवार संपताच चिकन, मटण, मासे खाणाऱ्यांची बाजारात गर्दी; सध्याचे वाढलेले दर माहिती आहे का?

गेल्या काही आठवड्यांपासून उत्सवांमुळे अनेकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवली होती. मात्र, सण उत्सव संपताच मांसाहारींनी पुन्हा बाजाराकडे धाव घेतली आहे. ...सविस्तर वाचा
19:27 (IST) 9 Oct 2025

आरोग्य विभागाच्या एनएचएम कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के मानधन वाढ!

कर्मचाऱ्यांचा आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ...सविस्तर बातमी
19:18 (IST) 9 Oct 2025

‘ते’ पाप शरद पवारांचे, जलसंपदा मंत्र्यांचे मराठा आरक्षणावरून टीकास्त्र; म्हणाले, “विरोधक लाडक्या बहिणींचा…’

बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा स्थानिक सहकार विद्या मंदिरमध्ये आज, गुरुवारी पार पडला. ...अधिक वाचा
19:09 (IST) 9 Oct 2025

शंकर पाटोळे यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी; न्यायालयाने पोलीस अधिक्षकांना उपस्थित राहण्याचे का दिले आदेश

ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. पालिकेच्या वर्धापन दिनीच ही कारवाई झाली होती. ...सविस्तर बातमी
19:00 (IST) 9 Oct 2025

निवृत्तधारकांच्या मागण्या येत्या १५ दिवसात निकाली काढा; मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियमांमध्ये राज्य शासन किंवा अन्य प्राधिकरण यांना अतिप्रदान वसुली करण्याबाबत विशिष्ट तरतुदी असल्या तरी, सर्वोच्च न्यायालयाने अशा अतिप्रदान रकमेची वसुली करू नये, असे आदेश दिले आहेत. ...अधिक वाचा
18:48 (IST) 9 Oct 2025

उजनीत ‘हेलिकॉप्टर’ माशांचा सुळसुळाट, पारंपरिक माशांवर संकट

सध्या उजनी जलाशयात पारंपरिक गोड्या पाण्यातील माशांचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. जलाशयात ‘हेलिकॉप्टर’ माशांचा वेगाने वाढणारा उपद्रव ही मच्छीमारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ...सविस्तर बातमी
18:32 (IST) 9 Oct 2025

डोंबिवली पलावामध्ये व्हाॅलीबाॅल सोसायटी आवारात आला म्हणून बालकांना रक्षकाने हात बांधून मारले

याप्रकरणी या मुलांच्या पालकांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
18:20 (IST) 9 Oct 2025

डोंबिवली गावदेवी मंदिर परिसरात तरूणांच्या दोन गटात पैशावरून राडा

याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात सुजल शरद म्हात्रे (२२) या तरूणाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ...सविस्तर बातमी
18:12 (IST) 9 Oct 2025

ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागातील १७० कर्मचाऱ्यांच्या बदलीस टाळाटाळ; भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांचे आयुक्तांना पत्र

महापालिकेच्या वर्धापनदिनीच ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाखांची लाच घेताना पकडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...सविस्तर बातमी
18:08 (IST) 9 Oct 2025

water supply closed: जुन्या भिवंडीचा पाणी पुरवठा शनिवारी बंद राहणार…, या भागांमध्ये पाणी येणार नाही

जुन्या भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहीनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे जुन्या भिवंडी शहराला होणारा पाणी पुरवठा शनिवारी बंद राहणार आहे. ...वाचा सविस्तर
18:07 (IST) 9 Oct 2025

‘अश्लीलता नसल्यास शिवीगाळ गुन्हा नाही’, उच्च न्यायालयाकडून प्राध्यापकावरील गुन्हा रद्द….

कलम २९४ अंतर्गत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती करणे, अथवा अश्लील गाणी किंवा शब्द उच्चारणे हा गुन्हा मानला जातो. यासाठी तीन महिन्यांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ...सविस्तर वाचा
17:58 (IST) 9 Oct 2025

नागपुरात शिवसेना ठाकरे गटाचे रेवतकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत

मुकेश रेवतकर हे 'दक्षिण नागपूर मधील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत. ...वाचा सविस्तर
17:57 (IST) 9 Oct 2025

राज्यातील प्रक्षिणार्थी झाले पुन्हा बेरोजगार; एकनाथ शिंदेच्या घरासमोर करणार साजरी काळी दिवाळी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील - चाकुरकर यांनी गुरुवारी ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. ...वाचा सविस्तर
17:42 (IST) 9 Oct 2025

ठाण्याच्या विद्यादान संस्थेच्या गीता शहा यांना ‘केशवसृष्टी पुरस्कार’

विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक आणि विश्वस्त गीता शहा या ग्रामीण भागातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने ‘विद्यादान’ १५ ऑगस्ट २००८ रोजी संस्थेची स्थापना केली. ...वाचा सविस्तर
17:33 (IST) 9 Oct 2025

MahaRERA Scam: डोंबिवलीत महारेराची नोंदणीकृत इमारत सांगुन घर खरेदीदाराची २१ लाखाची फसवणूक

विशेष म्हणजे घर खरेदी विक्रीचे बनावट कागदपत्र असताना सह दुय्यम निबंधक कल्याण क्रमांक दोन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या कागदपत्रांची खात्री न करता हे दस्त नोंदणीकृत केले आहेत. ...अधिक वाचा
17:17 (IST) 9 Oct 2025

डोंबिवलीत प्रसिध्द धावपटूला मोटारीने नेले फरफटत; अपघातामुळे दहा महिने आरामाचा डाॅक्टरांचा सल्ला

लक्ष्मण गुंडप असे या धावपटू आणि राष्ट्रीय फूटबाॅलपटूचे नाव आहे. ते डोंबिवलीत कुटुंबीयांसह राहतात. ते डोंबिवलीतील नवोदित, जाणत्या धावपटूंना मोफत प्रशिक्षण देतात. ...सविस्तर बातमी
17:05 (IST) 9 Oct 2025

गडकरींच्या नागपुरातील दोन्ही प्रकल्पांना न्या. गवईंच्या पीठाची मान्यता

अंबाझरी तलावाजवळून जाणाऱ्या नागपूर मेट्रोच्या उभारणीवर पर्यावरण आणि धरण सुरक्षेच्या कारणावरून आक्षेप घेण्यात आले होते. याबाबत मोहम्मद शाहिद शरीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. ...सविस्तर बातमी

Ladki Bahin Yojana

लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी, (फोटो-संग्रहित छायाचित्र)