Mumbai Political New Updates, 07 November 2025 : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र, यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात येत आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी आणि केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आणि हत्येचा कट रचण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Mumbai Breaking News Live Updates Today : राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Politics : जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप ते पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणाबाबत खडसेंचं मोठं वक्तव्य; वाचा आजची ५ राजकीय विधाने
"धरल्यावर चोरीचा ऐवज वापस केला जात असेल तर ती चोरी होत नाही का?", दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
पार्थ पवारांवर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारले आहेत.
चोराने चोरी केली आणि ती धरली गेली.. धरल्यावर चोरीचा ऐवज वापस केला जात असेल तर ती चोरी होत नाही का मुख्यमंत्री महोदय? या विषयी अजून खूप प्रश्न आहेत देवेंद्र फडणवीस जी..
१. एखाद्या कंपनीचे भांडवल लाखभर रुपये असताना ती कंपनी जमीन खरेदीसाठी ३०० कोटी कुठून आणि कसे आणते?
२. कंपनीच्या या ३०० कोटींचा सोर्स काय?
३. सही एकाची असली तरी त्याने ती त्या कंपनीच्या वतीने केली आहे. सहीचा हक्क दिलेला असताना कंपनीचा ठराव त्याच्या जोडीला असतो. मग गुन्हा फक्त एकावरच कसा?
४. शासनाचा कर बुडवला ही शासनाची फसवणूक आहे, मग पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही? कंपनीवर ही गुन्हा का दाखल नाही?
५. नैतिकता आणि पारदर्शक सरकार असल्याचे आपण सांगता. मग अजित पवारांच्या राजीनाम्यावर अद्याप निर्णय कसा झालेला नाही?
६. घपल्याचे आकडे पाहता, हे प्रकरण अजून ईडी कडे देण्यास सरकार इच्छुक का नाही?
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून राजकारण तापलं; पुण्यात मनसेचं आंदोलन, अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी आणि केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप पार्थ पवार यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पण पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या सर्व घडामोडीनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे. या भेटीत काही चर्चा झाली का? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर आता पुण्यात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
“…म्हणून तुम्ही गप्प आहात का?”; पार्थ पवार जमीन प्रकरणावरून राहुल गांधींचा थेट मोदींना सवाल; म्हणाले, “ही जमीन चोरी…”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी करून फक्त ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव : तहसीलदारांच्या नोटिस नंतरही बांधकाम विभागाच्या आवारातील वाळू साठा गायब…!
Video: ‘एमपीएससी’मध्ये राज्यातून प्रथम आलेल्या प्रगती जगतापच्या विजयी मिरवणुकीचा व्हीडीओ पाहिला का?, तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल
'माझं एक लग्न झाले आहे; आता तुझ्याशी करतो आहे…'
TET 2025: ‘टीईटी’च्या संदर्भात अफवांना बळी पडू नका; परीक्षा परिषदेने अखेर…
हिंगोलीत साड्या वाटपावरून महायुतीत वाद रंगला
पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डींग्ज कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार?…
कोल्हापूरमध्ये साखर हंगामाच्या प्रारंभीच नेतेमंडळींची तोंडे कडू
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवार सविस्तर भूमिका मांडणार? सुनील तटकरेंची माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी आणि केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पण पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या सर्व घडामोडीनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे. या भेटीत काही चर्चा झाली का? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाबाबत अजित पवार आज सविस्तर भूमिका मांडणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलतान दिली आहे.
Parth Pawar Pune Land Scam : पार्थ पवारांच्या कंपनीचं गौडबंगाल ! चार वर्षांत कमावलेलं उत्पन्न अखेर आलं समोर
Crime News: कुख्यात गुंडांच्या टोळी प्रमुखासह दहा जणांवर मोक्का
scrub typhus: सावधान! ‘स्क्रब टायफस’ने घेतला एक बळी; सहा रुग्ण…
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणानंतर अजित पवार तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी आणि केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पण पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे गणेश नाईक संघर्षात भर; शिंदे समर्थकांशी संबंधित इमारतींना अखेर भोगवटा प्रमाणपत्र
पार्थ पवार प्रकरणी तक्रार आल्यावर निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कानावर हात
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील कारवाई म्हणजे 'नौटंकी' काँग्रेसचे प्रवक्ते कडाडले, म्हणाले अजितदादा…!
देशातील बंदरांच्या विकासात ‘त्यांचे’ महत्व अधिक…
बेकायदा बांधकामांबाबत राज्यातील सर्वच महापालिका निद्रावस्थेत; उच्च न्यायालयाचे ताशेरे
महाविकास आघाडी आक्रमक : आता महायुतीच्या कोणासोबतही एकत्र न येण्याच्या सूचना
रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीतच लढत
MHADA Home Sale: म्हाडाचे वा स्वमालाकीचे घर असले तरी आता म्हाडाचे घर घ्या; मुंबई मंडळाने शोधून काढली म्हाडाची अंदाजे १०० घरे
Monorail Accident : तांत्रिक अहवाल सादर करा… एमएमएमओपीएलचे सल्लागार आणि मोनो गाडीची बांधणी करणाऱ्या कंपनीला आदेश
"...तर अजित पवारांवर आज ही वेळ आली नसती"; पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात वडेट्टीवारांचं वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी आणि केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पण पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. "अजित पवारांना या व्यवहाराची आधीच कल्पना आली होती, तर त्याच वेळेस हा व्यवहार रोखला असता तर बरं झालं असतं. घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला माहिती होत नाही? असं होऊ शकत नाही. त्यामुळे त्या वेळेस हा व्यवहार रोखला असता तर अजित पवारांवर आज ही वेळ आली नसती", असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तर मंत्र्यांचा दोष”
पमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच या प्रकरणात चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. त्याच बरोबर या प्रकरणात गुन्हा देखील झाला आहे. पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ‘मंत्र्यांची मुलं जर असं वागत असतील तर त्यामध्ये मंत्र्यांचा दोष असतो’, असं मोठं विधान अण्णा हजारे यांनी केलं आहे.

पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तर मंत्र्यांचा दोष”, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
