Marathi News Today : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे केलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं असून उपचारांसाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले आहेत. रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय व त्याआधारे शासन निर्णयात नमूद केलेल्या गावातील, नातेसंबंधातील, कुळातील या शब्दांना आमचा विरोध आहे. शासनाने शिंदे समितीच्या माध्यमातून खऱ्या ओबीसींसोबत धूळफेक केली आहे, असे ओबीसी युवा अधिकार मंचाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम म्हणाले आहेत. त्यामुळे यासंबंधी घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.
Manoj Jarange Patil Maratha Aarkshan Andolan GR : मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य यासंबंधी सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
“विखे पाटलांना लाज वाटली पाहिजे”, ‘त्या’ वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंचा संताप; म्हणाले, “पिढ्यान् पिढ्या घराणेशाही…”
Laxman Hake vs Radhakrishna Vikhepatil on Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मंगळवारी (२ सप्टेंबर) पाचव्या दिवशी मागे घेण्यात आलं. जरांगे यांच्यावर न्यायालयाचा रेटा तर दुसरीकडे सरकारवरील वाढता दबाव यातून उभयतांनी समजूतदारपणा दाखवल्यामुळे जरांगे यांच्या उपोषणाची सांगता झाली. राज्य सरकारने जरांगेंच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटियर स्वीकारलं आहे.
OBC Reservation : ओबीसींसाठी आता मंत्रिमंडळ उपसमिती गठीत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मरणानंतरही प्रेताचे हाल; संगमेश्वर कडवई येथे लोकांनी भर पाण्यात वाट काढत स्मशानभुमी गाठली
पुणेकरांसाठी मेट्रोची २ नवीन स्थानकं! अजित पवारांनी दिली माहिती
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बालाजीनगर व बिबेवाडी इथं ही दोन मेट्रो स्थानकं उभारली जाणार असून त्यासाठी अतिरिक्त खर्चास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे पुणे मेट्रो टप्पा-२ चा विस्तार अधिक कार्यक्षम होऊन पुणेकरांना आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.
सामान्य वाटणाऱ्या दैनंदिन सवयी आरोग्याला घातक? जाणून घ्या मूत्रपिंडांवर होणारा परिणाम…
सामान्य वाटणाऱ्या दैनंदिन सवयी आरोग्याला घातक? जाणून घ्या मूत्रपिंडांवर होणारा परिणाम…
Ganeshotsav 2025: काय तो आवाज, काय तो नाच ! आदेशाला डावलून नगरपरिषद कर्मचारी, अधिकाऱ्यांनी धरला 'डीजे'च्या तालावर…
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ओबीसी आंदोलकांचा ठिय्या, जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक
जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक झाले असून, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा सरकारने काढलेला जीआर फाडत पायदळी तुडवला. मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या राज्य सरकाने मंजूर केल्या आहेत. त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असून, जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वोट चोर गद्दी छोड मेळाव्यावर स्थानिक स्वराज्य निवडणुकीची छाप
किरीट सोमय्यांविरूद्ध काँग्रेसचे नेते आक्रमक!
मराठा आरक्षण निर्णयानंतर नाशिकमध्ये सर्वपक्षीय आनंदोत्सव…शिवसेना शिंदे गटात शांतता
छगन भुजबळ कोर्टात जाणार, मराठा आरक्षणासंदर्भातील शासन आदेशावर नाराजी; म्हणाले, "सरकारला हा अधिकार नाही"
वाठारकरांच्या एकजुटीपुढे शिक्षण सम्राटाची नरमाई; गावातील भूखंड परत करणार
अभिनेत्री सुहाना खान हीने अलिबागमध्ये खरेदी केलेली जमिन वादात; वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश
Ganeshotsav 2025: गणेशमूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनाला तब्बल ४२ जलकुंड
दोन वर्षे मुद्दामहून वाट पाहिली गेली का? मराठा आरक्षणाबाबत रोहित पवारांचा सरकारला सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर यासंंबंधी पोस्ट केली आहे-
रोहित पवारांची संपूर्ण पोस्ट
मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल काढलेल्या #gr मुळं मराठा समाजाचा विजय झाला असेल तर तो पूर्णतः मनोज जरांगे पाटील आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचा आहे. याबाबत त्यांचं मनापासून अभिनंदन!
पण यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात. मंत्रिमंडळ उपसमिती आधीही होती आणि आजही आहे. या समितीत मराठा नेत्यांसह गिरीश महाजन साहेब तर काल व्यासपीठावर जयकुमार गोरे हे ओबीसी नेतेसुद्धा होते, मग काल घेतलेला निर्णय सर्वमान्य होता तर हाच निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी का घेतला नाही? दोन वर्षे मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यासाठी मुद्दामहून वाट पाहिली गेली का? या आंदोलनाचा इशारा तीन महिने आधी दिला असताना, तेंव्हाच सरकारने कार्यवाही का केली नाही? न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच मंत्रिमंडळ उपसमिती का सक्रीय झाली? मुंबईकरांची आणि आंदोलकांची गैरसोय झाली पाहिजे, ही सरकारचीच भूमिका होती का?
कालच्या #gr बाबत तज्ज्ञांची मतं बघितली तर न्या. संदीप शिंदे समिती जे काम करत होती तेच काम जीआर मधून हैदराबाद गॅझेट या गोंडस नावाखाली होणार असल्याचं दिसून येतं. या जीआर संदर्भात अनेक शंका उपस्थित होत आहेत त्यावर सरकार उत्तर देणार आहे की नाही?
या #gr ची वैयक्तिक पातळीवरील दाखल्यासाठी वैधता प्रमाणपत्रांसाठी अमलबजावणी झाल्यावरच खरं काय ते कळेल. पण लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबईत मराठा आंदोलकांच्या हातावर तुरी दिल्या, तसंच आत्ताही जीआर मधील आश्वासनांची कालमर्यादा पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलकांची फसवणूक तर झाली नाही ना, हे देखील समोर यायला हवं? गेल्या वेळेस नवी मुंबईत झालेल्या फसवणुकीची पुनरावृत्ती होणार नाही ही सर्वसामान्य अपेक्षा आहे.
एकंदर बघता, या सरकारने केवळ दोन समाजात वाद निर्माण करुन सत्तेची पोळी भाजली, हे स्पष्ट झालं आहे. सरकारने गावगाड्यातील ओबीसी-मराठा समाजात वाद लावल्याबद्दल जनतेची माफी मागायलाच हवी. ऐनकेन करून सामाजिक व धार्मिक ध्रुवीकरण करण्यापेक्षा यापुढे शेतकऱ्यांच्या, युवांच्या मध्यमवर्गीयासह जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर काम करणं अपेक्षित आहे. तूर्तास ‘दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही’ हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती असली तरी महाराष्ट्राला अशा चाणक्यनीतीची नाही तर माणुसकीच्या नीतीची आणि महाराष्ट्र धर्माची गरज आहे हे विसरता येणार नाही.