Maharashtra Rain News Updates, 18 August 2025 : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाच्या ५ हजार कोटी रुपये किमतीच्या जमीनीवरून गंभीर आरोप केले आहे. यावरून राजकीय आरोप- प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. याबरोबरच मुंबई-पुण्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात अतिवृष्टीचीही शक्यता आहे. या पार्शवभूमीवर मुंबई-पुण्यासह राज्यातील पावसासंबंधी तसचे इतर राजकीय घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.
१८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० ते रात्री ११.३० पर्यंत मुंबईत कुठे किती पाऊस झाला? याबद्दल भारतीय हवमान विभागाने दिलेली माहिती–
स्टेशन | पाऊस (मिमी) |
टाटा पॉवर चेंबूर | ९१.५ मिमी |
विक्रोळी | ७८.५ मिमी |
जुहू | ६० मिमी |
सायन | ५८.५ मिमी |
वांद्रे | ५० मिमी |
सांताक्रूझ | ४७.२ मिमी |
कुलाबा | २९.० मिमी |
Mumbai Breaking News Live Update : राज्यातील पावसासंबंधीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?
मुंबईत ४६ ठिकाणी दरडी कोसळण्याचा मोठा धोका!
काँग्रेसच्या अधिवेशनात आरएसएसच्या डॉ. हेडगेवारांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मांडला होता, संघाचा नवीन दावा
‘आरएसएस’च्या स्थापनेमागील खरा उद्देश काय? स्वत: नितीन गडकरींनी केला खुलासा…
राज्यात अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश; नांदेड जिल्ह्यात लष्कराची मदत
महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यात सहभागी झाले. सर्व विभागीय आयुक्तांनी त्यांच्या विभागातील माहिती यावेळी सादर केली. निवारा केंद्रात राहणाऱ्या नागरिकांना भोजन, शुद्ध पाणी, पांघरूण इत्यादी सोयी प्राधान्याने द्या, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले.
रत्नागिरी, रायगड, हिंगोली येथे अधिक पाऊस झाला आहे. 17 ते 21 ऑगस्ट या काळात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे यापुढच्या काळात सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आतापर्यंत विविध घटनांमध्ये 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली आहे. जळगावमध्ये नुकसान अधिक आहे. अलमट्टीबाबत सातत्याने कर्नाटक सरकारशी चर्चा सुरू आहे. सद्या धोका नाही, पण यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुखेडमधील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. विष्णुपुरीकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 800 गावे बाधित आहेत. दक्षिण गडचिरोलीत जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अकोला, चांदूररेल्वे, मेहकर, वाशिम येथे आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भामध्ये 2 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुंबईमध्ये आज सकाळपासून 8 तासात 170 मिमी पाऊस झालेला आहे. 14 ठिकाणी पाणी तुंबले आहे, पण केवळ 2 ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली आहे. रेल्वे व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. मेट्रो वाहतूक सुद्धा सुरळीत आहे. मुंबईत पुढचे 10 ते 12 तास महत्वाचे आहेत. त्यामुळे काळजी घेण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे. उद्याचे अंदाज लक्षात घेता सुटी जाहीर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासन आणि महापालिका यांना दिले गेले.
नागरिकांना एसएमएस पाठवताना त्यात नेमकी वेळ नमूद करावी. येणारा प्रत्येक अलर्ट गांभीर्याने घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागरिकांनी सुद्धा स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तातडीने मदत देण्यासाठी मंत्रालयापर्यंत येऊ नका. तुम्हाला निधी आणि अधिकार देण्यात आले आहेत. घरांच्या पडझडसाठीची मदत देण्यासाठी सुद्धा स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. पंचनामे योग्य प्रकारे करा, त्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. धोकापातळी वाढण्यापूर्वी तत्काळ अन्य राज्यांशी संपर्कात रहा. पर्यटक जेथे जातात, तेथे पोलिसांनी सतर्क राहावे. जेथे दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, तेथे आधीच यंत्रणा कार्यरत करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री ॲड. आशिष शेलार मुख्य सचिव, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन, कृषि विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय नियंत्रण कक्षात महाराष्ट्रातील अतिवृष्टीसंदर्भात बैठक झाल्यानंतर ही अशी मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
"गरज असल्यासच घराबाहेर पडा", एकनाथ शिंदेंचे नागरिकांना आवाहन
"सतर्क रहा, काळजी घ्या….. मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर आणि मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. आज पावसाची तीव्रता वाढली असून मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान खात्याने मुंबई, ठाणे,रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केले असून पुढील ४८ तासात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थिती काळजी घ्यावी, गरज असल्यासच घराबाहेर पडावे." असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
"मुंबईतील पावसाची भीषणता आणि दक्ष पोलीस दल"; रोहित पवारांनी पोस्ट केला हृदयस्पर्शी फोटो
मुसळधार पावसानंतर मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत. यांमुळे शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुपपणे घरी परत पाठवण्यासाठी पोलीस दल मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावरील पाण्यातून पोलीस कर्मचाऱ्यांन लहान मुलांना पोलिसांनी उचलून बाहेर काढलं. अशाच एका पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याबरोबरच त्यांनी पोलीस दलाचं कौतुक केलं आहे.
"मुंबईतील पावसाची भीषणता आणि दक्ष पोलीस दल…! नैसर्गिक आपत्ती असो की मानवनिर्मित…. पोलिसकाका मुंबईत तुमच्यामुळंच आम्ही सुरक्षित आहोत, असंच ही शाळेतली चिमुकली मुलं या पोलीस कर्मचाऱ्याला म्हणत असतील ना! म्हणूनच महाराष्ट्र पोलीस दल सदैव आदरास पात्र ठरतं…!" असं कॅप्शन रोहित पवारांनी या फोटोला दिले आहे.
मुंबईमध्ये जोरदार पाऊस! चेंबूरमध्ये पालिकेच्या रुग्णालयात शिरलं पाणी
चुनाभट्टी विभागातील स्वदेशी मिल कामगाराच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याची घटना समोर आली आहे. या कामगाराच्या घरातील अत्यावश्यक वस्तूंचे यामुळे नुकसान झाले. याबरोबरच चेंबूरमध्ये पालिकेच्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणांत पाणी भरले आहे. यामुळे रुग्णांना सुमारे चार ते पाच फूट पाण्यातून वाट काढत रुग्णालयात जावे लागत आहे.
चेंबूर वाशी नाका मध्ये एमएमआरडी संरक्षणभिंत कोसळून ७ झोपड्यांचे नुकसान
मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काल दिनांक १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास चेंबूर वाशी नाका मधील न्यू अशोक नगर येथील एमएमआरडी संरक्षणभिंत कोसळून 7 झोपड्यांचे नुकसान झाले आहे यात प्रभावित कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था मरवली चर्च येथे करण्यात आली आहे.
सिंदखेडराजातील तलाव फुटला! शेकडो एकर शेतात पाणी, पिकांची नासाडी
"दक्षिण मुंबईत २० कोटींचा फ्लॅट घेऊनही…", पावसाचा जोर, शहर तुंबलं, सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया
भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली; रस्ता वाहून गेला, वाहतुकीवर परिणाम
Pune Rain Alert : पुणे शहरात संततधार… पुढील तीन दिवस पावसाचेच?
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला राज्यातील अतिवृष्टीचा आढावा
राज्यात विविध भागात जी अतिवृष्टी होत आहे, त्यासंबंधित राज्याच्या कंट्रोल रुममधून संपूर्ण राज्यात संवाद साधला. गेले दोन दिवस काही भागात अतिवृष्टी होत आहे. १८ ते २१ या दरम्यान पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. १५ ते १६ जिल्हे असे आहेत ज्यापैकी काही जिल्ह्यात रेड तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. कोकण विभागात जास्त रेड अलर्ट पाहायला मिळत आहेत. जगबुडी, हंबा, कुंडलीका या इशारा पातळीपर्यंत पोहचल्या आहेत, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Thane District Rain Alert: ठाणे जिल्ह्यासाठी पुढचे काही तास महत्वाचे !
पावसात अडकलेल्या मुंबईकरांसाठी मेट्रोची खास पोस्ट
मुंबईतील पावसात रस्त्यांवर वाहतूक कोंडीच्या घटना समोर येत आहेत, यादमरम्यान मुंबई मेट्रोकडून खास पोस्ट करण्यात आली आहेय
Mumbai Heavy Rain Alert सर्वाधिक पाऊस चेंबूरमध्ये
Lendi Dam Flood Situation: नांदेडमधील ‘लेंडी’ धरणावरील घळभरणी; ९ गावांमध्ये प्रचंड हानी!
Red Alert, Thane collector : विद्यार्थी रेड अलर्टमध्येही पोहोचले शाळेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेची वाट बघत...
सार्वजनिक बांधकाम खाते निद्रिस्त ? वाहतूक पोलीस बुजवताहेत खड्डे
Pavana Dam : पवना धरणातून ८०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Ghodbunder road : ठाण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस, घोडबंदर रस्त्यावर साचले पाणी
१८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० ते रात्री ११.३० पर्यंत मुंबईत कुठे किती पाऊस झाला? याबद्दल भारतीय हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार -
Beed Rain News: बीडमध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहून गेली, तिघांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू
Beed Rain News: बीडमध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहून गेली, तिघांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; परिस्थितीबद्दल दिली माहिती
"नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे 206 मि.मी. इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे.
रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. एनडीआरएफची 1 चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.