Maharashtra News Updates, 25 August 2025: राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांनी या दृष्टने तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आज मुंबई विभागाचे अध्यक्ष म्हणून आमदार अमित साटम यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री अशिष शेलार यांच्या उपस्थितित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
याचबरोबर गेल्या १० दिवसांपासून राज्यात सुरू असलेला पाऊस हळू हळू कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. पण, मुंबईत मात्र अजूनही जोरदार पाऊस कोसळत आहे. आज, मुसळधार पावसामुळे विले-पार्लेत वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच सततच्या पावसामुळे सध्या हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे आणि विमान सेवेवर किरकोळ परिणाम होत आहे, त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सने सोमवारी मुंबईतील विमानांसाठी प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. यासह राज्यातील विविध घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Mumbai Breaking News Live Update
राज्यातील शाळांच्या रचनेत तीस वर्षांनी मोठा बदल… आता काय होणार?
नवी दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; भुसावळ-मुंबई मार्गावर गाड्या खोळंबल्या…
नाशिक : पावसात आदिवासी संघटनांचा मोर्चा, लोकप्रतिनिधींसह विद्यार्थ्यांचाही समावेश
नाशिक : मोर्चामुळे वाहतूक कोंडी
गणेशोत्सवाच्या तोंडावर ऑटो डिलर्सचे सरकारला घाई करण्याचे गाऱ्हाणे; नवीन जीएसटी सुधारणांबाबत त्यांनी केली ही मागणी
जळगाव शालार्थ घोटाळा… नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘त्या’ मुख्याध्यापकांची चौकशी
गणेशोत्सव काळात ‘पीएमपी’च्या जादा बस, तिकीट दर दहा रुपये जास्त; पाससेवा रात्री १२ वाजेपर्यंतच
शहरातील खड्डे तातडीने बुजवा, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी महापालिका आयुक्तांचा आदेश
पिंपरी : म्हाळुंगे एमआयडीसीत पोलिसावर सत्तूरने वार, हाताला चावा
पुणे: ‘फ्रेशर्स पार्टी’ आयोजकांना पोलीस आयुक्तांचा इशारा, गैरप्रकार आढळल्यास इव्हेंट कंपनी, हॉटेल, पबचा परवाना रद्द करून गुन्हा
Pune Traffic Routes: गणेश प्राणप्रतिष्ठा, मूर्ती खरेदीनिमित्त दोन दिवस वाहतुकीत बदल
मतदार यादीतील घोळाचा आरोप करणाऱ्या प्रा. संजय कुमार यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, पोलिसांनी गुन्हा…
कोकणवासीयांच्या सुविधेसाठी विदर्भवासीयांची अडचण… ऐन सणासुदीत एका निर्णयामुळे…
शाळांच्या संचमान्यतेसाठी आधार क्रमांकाची अट रद्द करा, शिक्षक संघटनांची मागणी…
"निवडणुका आल्या की तुमची नौटंकी सुरु होते", मनोज जरांगे-पाटील यांच्यावर भाजपा आमदाराची टीका
मनोज जरांगे-पाटील यांच्यावर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील हा सल्ला समजा किंवा इशारा समजा. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता, परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आया बहिणींचा सन्मान कसा करावा हे शिकवले. त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीने महिलांचा अपमान करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईंचा अवमान केला हे सहन केले जाणार नाही. ज्या शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांचे नाव तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या की तुमची नौटंकी सुरु होते."
Parinay Fuke : आज शिवाजी महाराज असते तर, जरांगेची जीभ छाटली असती… - भाजप आमदार परिणय फुके
राजकमल चौकातील पुल बंद केल्याने अमरावतीकरांना वाहतूक कोंडीचा फटका
"नागपूर तुला एनएमसीवर भरोसा नाय का?”, काँग्रेसचे आंदोलन, खड्ड्यांच्या फोटोंचे प्रदर्शन
"मी अपशब्द वापरले नाहीत", मनोज जरांगे-पाटलांचे स्पष्टीकरण; म्हणाले, "मी कधीही..."
आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही, असा इशारा या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
यावेळी जरांगे-पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, येवल्याच्या एका माणसाचं ऐकून आम्हा मराठा समाज बांधवांवर अन्याय करत आहेत, हे चुकीचं आहे. आता त्यांनी एक नवीन फंडा बाहेर काढला आहे की, मी त्यांच्या आईला शिव्या दिल्या आहेत. मी कधीही कुणाच्या आई बहिणींना शिव्या देत नाही आणि जर दिल्या पण असतील तर मी माझा शब्द मागे घेतो."
सिंहगड उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी मनसे आक्रमक… पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
‘मी भोकरचा - भोकर माझे…’ चव्हाणांचे एक पाऊल मागे !
कंत्राटी शिक्षक पाच महिन्यांपासून मानधनापासून वंचित, शिक्षण मंत्र्यांना निवेदन देऊनही…
लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी विशेष सोय;गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेवर विशेष व्यवस्था
महायुतीचा महापौर बसविणार, मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, आमदार अमित साटम यांचे प्रतिपादन
"हाताला काम द्या अन् कायमस्वरूपी करा, अन्यथा…," मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीं आक्रमक…
"तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदींना पण डाग लागू शकतो", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मनोज जरांगे यांची टीका
राज्य सरकारने षडयंत्र रचत आंदोलनात काही लोक घुसवले आहेत. त्यांनी काही गोंधळ केल्यास त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फडणवीस, तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदींना पण डाग लागू शकतो हे लक्षात ठेवा, अशा शब्दांमध्ये जरांगे यांनी इशारा दिला.
बीडच्या उपाधीक्षकांनी डीजे लावू दिला नाही आणि हे सगळं फडणवीस यांच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काल-परवा फडणवीस यांनी मागणी नसतानाही २९ जाती ओबीसीमध्ये सामील केल्या. मात्र मराठा समाज मागणी करत असतानाही त्याला ओबीसीमध्ये घेतले जात नाही. आपल्या ५८ लाख कुणबी नोंदी असूनही आपल्याला आरक्षण दिले जात नाही. याचबरोबर सरकारने ‘लाडक्या बहिणीं’नाही फसवल्याचा आरोप जरांगे यांनी केला.
जीवाचा धोका पतकरून ७० फूट खोल विहिरीत उतरले, अजगराला …
‘एमपीएससी’च्या अर्ज प्रक्रियेत मोठा गोंधळ; शेकडो विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब, मात्र…
गणेशोत्सव की निवडणूक; प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर हरकती सूचनासाठी गणेशोत्सवात भावी उमेदवारांची धावपळ
गेल्या १० दिवसांपासून राज्यात सुरू असलेला पाऊस हळू हळू कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. पण, मुंबईत मात्र अजूनही जोरदार पाऊस कोसळत आहे. आज, मुसळधार पावसामुळे विले-पार्लेत वाहतूक विस्कळीत झाली होती.