मुंबई : राज्यात दिवसभरात ४५०५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली तर ६८ जणांचा मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ७५६८ करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६८ हजार ३७५ इतकी झाली आहे. राज्यात दिवसभरात अहमदनगर येथे ५७५, पुणे ३९८, पुणे मनपा १३९, पिंपरी चिंचवड ११८, सोलापूर ४०१, सातारा ५६५, कोल्हापूर ३३५, सांगली ४७८, सांगली-मिरज-कूपवाड १११, रत्नागिरी ११३, बीड येथे १६५ नव्या रुग्णांची नोंद झाली.

मुंबईत २०८ नवे रुग्ण,  तिघांचा मृत्यू

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार सुरू असून सोमवारी त्यात घट झाल्याचे दिसून आले. सोमवारी २०८ नव्या रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या सात लाख ३७ हजार ७२४ झाली आहे. करोना मृतांची एकूण संख्या १५ हजार ९५४ झाली आहे. शिवाय एका दिवसात ३७२ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या सात लाख १५ हजार ३८९ म्हणजेच ९७ टक्के झाली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट होऊन ती ३,९६१ झाली आहे.  रविवारी २६ हजार ४४५ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ८४ लाख ३९ हजार ५२१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधी १,६८० दिवसांवर गेला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात १८३ रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यात सोमवारी १८३ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, सहा जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्य़ातील १८३ रुग्णांमध्ये नवी मुंबई ५०, ठाणे ४९, कल्याण-डोंबिवली २९, बदलापूर १६, मीरा भाईंदर १२, ठाणे ग्रामीण १२, अंबरनाथ नऊ, भिवंडी आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले. तर, नवी मुंबई दोन, उल्हासनगर दोन, कल्याण-डोंबिवली एक आणि ठाण्यातील एकाचा मृतांमध्ये समावेश आहे.