सांगली : सत्ता हाती येताच घटक पक्षांकडे दुर्लक्ष करणार्‍यांना आता घटक पक्षांची आठवण झाली. निवडणुकीवेळी वाजंत्री म्हणून आमचा वापर करणार आहात का? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी उपस्थित केला. घटक पक्षामध्ये काहीही मतभेद असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धारही या मेळाव्यात करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीत सहभागी असलेल्या १६ घटक पक्षांचा मेळावा रविवारी सांगलीत पार पडला. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात जागतिक स्तरावर भारताला मानसन्मान आणि पत निर्माण करून देणार्‍या आणि देशातील सर्वांचा विकास साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावे ही सर्वांचीच इच्छा असल्याचे मत घटक पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – सोलापूर : सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने अक्षता सोहळा

यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार विलासराव जगताप, शेखर इनामदार, रिपाईचे जगन्नाथ ठोकळे, शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र चंडाळे, माजी आमदार नितीन शिंदे आदींसह घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार कोरे यांनी देशाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी यांच्याकडेच राहिले पाहिजे या भूमिकेतून येत्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी ठाम निर्धार यावेळी आपण व्यक्त करू. मोदी यांनी सामान्य माणसासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत.

हेही वाचा – VIDEO : प्रचंड गर्दीत नुसती घोषणा ऐकून शरद पवारांनी कार्यकर्त्याला ओळखलं; आमदार म्हणाले, “स्मरणशक्तीला सलाम!”

यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री खोत यांनी घटक पक्ष या नात्याने आम्ही रस्त्यावरचा संघर्ष केला. मात्र गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत घटक पक्ष म्हणून मानसन्मान तर मिळालाच नाही, साधे संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अथवा पाच लाखांचा निधीही नियोजन मंडळातून मिळू शकला नाही. तरीही आता लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी निश्‍चितपणे पार पाडू, असा विश्‍वास व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti meeting in sangli what did sadabhau khot say about parties in mahayuti ssb
First published on: 14-01-2024 at 17:37 IST