Satyacha Morcha Mumbai Against EVM Hacking Vote Chori Maharashtra Election : मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडीचा आज मुंबईत मोर्चा आहे. या मोर्चात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसंच महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय. आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा काढण्यात आला. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Live Updates

Raj Thackeray and Uddhav Thackeray Satyacha Morcha Mumbai Live Updates : 'अन्यायाच्या विरोधात सत्याचा मोर्चा', जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट 

15:18 (IST) 1 Nov 2025

अॅनाकोंडाला कोंडावंच लागेल नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत-उद्धव ठाकरे

अॅनाकोंडाला आपल्याला आता कोंडावंच लागेल. नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत. रोज कुठून तरी पुरावे येत आहेत. तरीही राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग गप्प बसले. आपला पक्ष चोरला, नाव चोरलं, निशाणी चोरली माझे वडील चोरी करायचा प्रयत्न झाला आणि ते पण पुरलं नाही म्हणून आता मतचोरी करत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की विरोधी पक्षांनी म्हणजे आपण कसा लाभ घेतला याचा पर्दाफाश करेन. मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच. मुख्यमंत्री जेव्हा असं बोलत आहेत त्याचा अर्थ त्यांनी मतचोरी मान्य केली आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

15:06 (IST) 1 Nov 2025

साडेचार हजार लोकांनी भिवंडी, कल्याणला मतदान केलं आणि मलबार हिललाही मतदान केलं-राज ठाकरे

कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पालघर इथल्या साडेचार हजार मतदारांनी मलबार हिलमध्येही मतदान केलं आहे. माझ्याकडे साडेचार हजार नावं आहेत. त्यांनी त्या मतदार संघात मतदान केलं आहे आणि मलबार हिल या ठिकाणीही मतदान केलं आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

15:04 (IST) 1 Nov 2025

आजचा मोर्चा राग आणि ताकद दाखवण्याचा मोर्चा-राज ठाकरे

आजचा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत आवाज पोहचवण्याचा मोर्चा आहे. आत्तापर्यंत या विषयावर सगळे जण बोलले आहेत. मी पण माझी भूमिका मांडली आहे. या विषयावर आता नव्याने बोलण्यासारखं काही नाही. तुम्ही सगळेजण अत्यंत ताकदीने मोर्चासाठी जमलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दुबार मतदार आहेत हे आम्ही सांगतो आहे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील हे सगळे सांगत आहेत. भाजपाचे लोक सांगत आहेत, अजित पवारांचे लोक सांगत आहेत एकनाथ शिंदेंचे लोक सांगत आहेत की दुबार मतदार आहेत. मग निवडणूक घेण्याची घाई का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

15:02 (IST) 1 Nov 2025

वसई-विरारमधून शिवसेना ठाकरे गट-मनसेचे शेकडो कार्यकर्ते सत्याच्या मोर्चात सामील

मतदार याद्यांमध्ये झालेल्या कथित गोंधळावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरले आहे. ...सविस्तर बातमी
13:44 (IST) 1 Nov 2025

पराभवाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी विरोधकांचा मोर्चा-चित्रा वाघ

विरोधक त्यांच्या पराभवाची पार्श्वभूमी तयार करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनता यांची माती करणार आहे हे यांना कळलं आहे. त्यामुळे महाभकास आघाडीचा मोर्चा निघतो आहे. जनतेचा विश्वास हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे असं भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

13:29 (IST) 1 Nov 2025

आजचा मोर्चा हा लोकभावनेतून निघाला आहे-संदीप देशपांडे

आमचा मोर्चा हा मविआ आणि मनसेचा मोर्चा नाही. हा जनतेचा मोर्चा आहे. जनक्षोभ उसळला आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तर अमित साटम यांनी विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. पराभवानंतर कारण देण्यासाठी हा मोर्चा आहे असं अमित साटम यांनी म्हटलं आहे.

13:22 (IST) 1 Nov 2025

MNS and MVA Satyacha Morcha: निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाला “सत्याचा मोर्चा” नाव का, मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिले स्पष्टीकरण

MNS and MVA Morcha against EVM Hacking Vote Chori Maharashtra: मनसे नेते अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ...सविस्तर बातमी
12:58 (IST) 1 Nov 2025

डोंबिवलीजवळील खोणीतील नवनिर्वाचित सरपंच; महिलेशी उध्दव ठाकरे यांनी साधला संवाद

डोंबिवली जवळील पलावा खोणी गाव ग्रुप ग्रामपंचायतीमधील नवनिर्वाचित सरपंच ज्योती विश्वास जाधव यांची शुक्रवारी सरपंच पदी नियुक्ती झाली. ...अधिक वाचा
12:51 (IST) 1 Nov 2025

मविआ आणि मनसेच्या मोर्चाचे अपडेट्स पाहा या व्हिडीओत

महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा काही वेळातच मुंबईत सुरु होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चगेट या ठिकाणी पोहचले आहेत. दुपारी ४ च्या दरम्यान नेत्यांची भाषणं होतील. या मोर्चाचे सगळे अपडेट्स पाहा या व्हिडीओत.

12:51 (IST) 1 Nov 2025

आजारी संजय राऊतांविषयी नरेश म्हस्के म्हणाले, "राऊत आमचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत पण, शत्रू नाहीत"

शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे काही काळ सामाजिक आणि राजकीय जीवनातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...सविस्तर वाचा
12:39 (IST) 1 Nov 2025

Mumbai Local Mega Block : जुळ्या स्थानकांसह मशीद, सँडहर्स्ट रोडचा लोकल थांबा रद्द

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वे रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
12:35 (IST) 1 Nov 2025

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे नागरी सुविधांमध्ये कमतरता ठेवू नये; महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश

महापरिनिर्वाण दिन पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी आयोजित विशेष आढावा बैठकीदरम्यान गगराणी बोलत होते. ...सविस्तर बातमी
12:30 (IST) 1 Nov 2025

पुणे महापालिका आयुक्तांनी का केला साडेचार कोटी रुपयांच्या पुस्तक खरेदी प्रस्ताव नामंजूर !

पुणे महापालिकेच्या शाळेत इयत्ता दुसरी ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित, इंग्रजी, बुध्दिमत्ता, संगणक या विषयांच्या लेखन सरावासाठी व्यवसाय पुस्तके खरेदीचा निर्णय महापालिका प्रशासकाकडून घेण्यात आला होता. ...सविस्तर बातमी
12:28 (IST) 1 Nov 2025

Raj Thackeray Local Train Travel: राज ठाकरेंच्या लोकल ट्रेन प्रवासाची चर्चा, ऐन गर्दीच्या वेळेला दादरहून मिळाली विंडो सीट; ट्रोलिंगही झालं

निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेल्या सत्याच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई लोकलने प्रवास केला. वाचा सविस्तर वृत्त

11:37 (IST) 1 Nov 2025

महानिर्मितीचे राज्यभरातील १० वीज निर्मिती संच बंद… राज्यातील वीज पुरवठ्यावर…

राज्यातील विविध भागात पडणाऱ्या पावसामुळे विजेच्या मागणीत मोठी घट झाली आहे. ...सविस्तर वाचा
11:02 (IST) 1 Nov 2025

मुख्यमंत्र्यांचे खिलाडू वृत्तीचे धडे, प्रत्यक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेची निवडणूक राजकीय चर्चेचा विषय ठरली कारण राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील मित्रपक्ष या निवडणुकीत परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत. ...सविस्तर वाचा
11:01 (IST) 1 Nov 2025

मविआचे ३१ खासदार निवडून आले तेव्हा मतचोरी झाली होती का? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली होती का? लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता का? दुबार आणि तिबार नावं मतदार याद्यांमध्ये नसावीत ही आमचीही भूमिका आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या काळात असा मोर्चा काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. महाविकास आघाडीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. अशा मोर्चाला राज ठाकरे जात आहेत याचं मला आश्चर्य वाटतं असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. लोकसभेला तेच मशीन होतं, त्याच मतदार याद्या होत्या. तुम्ही जिंकले की मतदार याद्या चांगल्या. हरले की मतदार याद्यांचा घोळ, बोगस मतदार याद्या हे बोलत रहायचं. महाविकास आघाडीत प्रचंड धुसफूस आहे. काँग्रेसच्या चार नेत्यांची चार तोंडं वेगळ्या ठिकाणी आहेत. या मोर्चात काही दम नाही हे काँग्रेसलाही माहीत आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

10:58 (IST) 1 Nov 2025

'स्थानिक'मध्ये पक्षनिष्ठांकडे दुर्लक्ष? काँग्रेस-भाजपमध्ये अंतर्गत कलह…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वर्चस्व स्थापन करण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. ...वाचा सविस्तर
10:24 (IST) 1 Nov 2025

मुंबईतल्या मोर्चासाठी नाशिकहून मनसे कार्यकर्ते मुंबईत

मुंबईत होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी नाशिकहून शेकडोंच्या संख्येने मनसेचे पदाधिकारी रवाना झाले आहे. आज मुंबईत विरोधकांचा मत चोरी आणि मतदार यादीतील घोळ संदर्भात मोठा मोर्चा निघणार आहे यात नाशिकहून शेकडो मनसैनिक रवाना झालेय यावेळी त्यांनी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केले जनतेला फसवून हे सरकार आलेले आहे मतदाराची दिशाभूल केलीय ९६ लाख मतदार वाढवले असून ते बोगस मतदार मतदान यादीतून वगळावे यासाठी हा सत्याचा मोर्चा आहे आणि यात सगळे नागरिक सहभागी होणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

10:18 (IST) 1 Nov 2025

सत्याचा मोर्चाचा मार्ग नेमका कसा असेल?

मोर्चाचा मार्ग नेमका कसा असेल?

दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान मुंबईतील फॅशन स्ट्रीट या भागातून मोर्चा सुरु होईल.

फॅशन स्ट्रीटकडून मोर्चा मेट्रो सिनेमाच्या चौकात आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या दिशेने जाईल

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ स्टेज उभारण्यात आलं आहे. त्या ठिकाणी मविआच्या नेत्यांची भाषणं होतील. राज ठाकरेंचंही भाषण होईल.

उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणं होण्याची शक्यता आहे

10:16 (IST) 1 Nov 2025

सत्याचा मोर्चा मुंबई, काय आहेत विरोधकांच्या मागण्या?

विरोधकांच्या मागण्या काय आहेत?

१) महापालिका निवडणुकांच्या आधी मतदार याद्या अद्ययावत करा, त्यात कुठलीही चूक नको

२) मतदार याद्या अद्ययावत होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला तरीही चालेल.

३) मतदार याद्यांमधली दुबार नावं काढा

४) ७ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा

या चार प्रमुख मागण्या राज ठाकरेंच्या मनसेने आणि महाविकास आघाडीने केल्या आहेत. सत्याचा मोर्चा याच मागण्यांसाठी काढला जाणार आहे. राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोग आणि भाजपा यांचं साटंलोटं असल्याचंही म्हटलं होतं. आता राज्यातही महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार याद्यांचे घोळ आहेत असा आरोप केला आहे. मोर्चात आणखी काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

10:10 (IST) 1 Nov 2025

मतदार याद्या दुरुस्त करुनच निवडणुका घ्या-अनिल देशमुख

आपल्या सर्वांना कल्पना आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये या पद्धतीने मोठ्या प्रमाणात माध्यमातून घोटाळे झाले मत चोरी झाली, हे काही काही घरांमध्ये १३० लोक दाखवलेले आहे, नवी मुंबईच्या मुंबई कमिशन च्या घरामध्ये अशाच पद्धतीने मतदार दाखवले. मतदार यादीतील चूक दुरुस्त करावा नंतरच निवडणुका घ्याव्या अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय.

Raj Thackeray mva meeting