डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त गडचिरोतील अहेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत माजी आमदार दीपक अत्राम यांचा अंगरक्षकाचा मृत्यू झाला. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त थल्लेवाडा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी नक्षवाद्यांच्या एका गटाने कार्यक्रमात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी अत्राम यांचे अंगरक्षक नानाजी नागोसे यांना गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यातून सुदैवाने अत्राम बचावले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोळीबारानंतर घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे. परिसर ताब्यात घेण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2016 रोजी प्रकाशित
गडचिरोलीत आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात नक्षलवाद्यांचा गोळीबार
या घटनेत माजी आमदार दीपक अत्राम यांचा अंगरक्षकाचा मृत्यू झाला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 14-04-2016 at 17:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxals open fire in gadchiroli event of babasaheb ambedkar birth anniversary