मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजपाच्या काही नेत्यांकडून पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक पद्धतीने डावललं जातंय, असा रोष कार्यकर्त्यांमध्ये आहे. पण पंकजा मुंडे यांनी यावर अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. आपण पक्षात नाराज नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

अलीकडेच पंकजा मुंडे यांनी नाशिक येथे “आपण कुणासमोर झुकणार नाही” असं विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. पंकजा मुंडेंच्या नाराजीची चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हेही वाचा- “…तर आपल्या बाब्याला कार्टं व्हायला वेळ लागणार नाही”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं सूचक विधान!

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपाने प्रचंड त्रास दिला. तेच आता पंकजा मुंडे यांच्याबरोबर घडतंय, अशा आशयाचं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे हयात असताना घडलेल्या एका घटनेचाही उल्लेख केला आहे.

हेही वाचा- “आता बोलायची वेळ आलीय, कारण…”; बीडमध्ये पंकजा मुंडेंचं थेट विधान, नेमका रोख कुणाकडे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोपीनाथ मुंडे यांच्यावर झालेल्या छळाची माहिती देताना एकनाथ खडसे म्हणाले, “स्वर्गीय भाजपा नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना, त्यांना भाजपानं किती त्रास दिला? हे मला माहीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. त्यावेळी मी स्वत: त्यांच्याबरोबर हजर होतो. मधल्या काळात त्यांची (गोपीनाथ मुंडे) इतकी छळवणूक झाली की, त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार येत होता. पक्ष सोडून द्यावा, अशी स्थिती निर्माण झाली होती. तोच प्रकार आता पंकजा मुंडेंबरोबर सुरू आहे.”