अलिबाग : रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या रोपवे ला चौथी ट्रॉली जोडण्यात आली आहे. ज्यामुळे एकाच वेळी ४८ प्रवासी चढ उतार करू शकणार आहे.

रायगड किल्ल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक हजेरी लावत असतात. यात अबाल वृद्धांचा समावेश असतो. पायरी मार्गाने किल्ल्यावर जाणे अतिशय अवघड आणि दमछाक करणारे असते. अशावेळी रोपवे हा पर्यटकांसाठी उपयुक्त ठरतो. मात्र याची आसनक्षमता कमी असल्याने पर्यटकांना नंबर येण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन पृथ्वीची असं क्षमता आता वाढवण्यात आली आहे. गडावर जाण्यासाठी चार आणि उतरण्यासाठी चार रोपवेच्या ट्रॉलीज बसवण्यात आले असून त्यांची तांत्रिक चाचणी सध्या सुरू आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर २४ एप्रिल पासून चौथी ट्रॉली पर्यटकांसाठी खुली केली जाणार आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : शरद पवार यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे यांनी फोडला प्रचाराचा नारळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोपवे मधून सध्या एका वेळेला ३२ प्रवासी चढ उतार करतात. १६ वर जाणाऱ्या आणि १६ खाली येणाऱ्या प्रवाशांचा समावेश असतो. चौथी ट्रॉली लागल्यामुळे एका वेळी ४८ प्रवासी चढ-उतार करू शकणार आहेत. ज्यात २४ वर जाणाऱ्या आणि २४ खाली येणाऱ्या प्रवाशांचा समावेश असणार आहे.