scorecardresearch

“शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरता”, अंबादास दानवेंची टीका; म्हणाले, “गद्दारांनी मनसे, प्रहार…”

Shivsena Vs Shinde Group : शिवसेना कोणाची यावरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.

“शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरता”, अंबादास दानवेंची टीका; म्हणाले, “गद्दारांनी मनसे, प्रहार…”
एकनाथ शिंदे अंबादास दानवे ( संग्रहित छायाचित्र )

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज ( २७ सप्टेंबर ) सुनावणी पार पडली. या सुनावणीत खरी शिवसेना कोणाची? ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबातचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलासा, तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का हा मानला जात आहे. यावरती राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य करत शिंदे गटावर टीका केली आहे.

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांची हीच खरी शिवसेना आहे. शिंदे गटातील आमदार शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आले आहेत. त्यांना निवडणुकीसाठीचा अर्ज देखील उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अपेक्षाभंग झालेला नाही, आम्हाला न्याय मिळेल. शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. खरं यश शिवसेनेला मिळेल,” असे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – “शिवसेना पक्ष कुणाची जहागीर नाही”; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया

“निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी…”

“चाळीस बंडखोर आमदारांनी गद्दारी केली, तर शिवसेना सोडून द्यायची होती. मनसे, प्रहार किंवा भाजपात प्रवेश करायचा होता. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यातंर्गत त्यांच्यावर कारवाई झाली नसती. मात्र, अन्य पक्षात विलीन व्हायचं नसेल, ते अपात्र ठरतील. मग, राज्यात निवडणुका जाहीर होती, यासाठी शिवसैनिकांनी तयार राहिलं पाहिजे,” असेही आवाहनही अंबादास दानवे यांनी केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या