राज्याच्या काही भागांत शनिवारी मोसमी पावसाने चांगली हजेरी लावली. शनिवारी सकाळपासून विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. अशातच रायगड आणि रत्नागिरीला अतिमुसळधार ( ऑरेंज अलर्ट ) पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांत पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच, नैऋत्य मोसमी पावसाने रविवारी मुंबई आणि दिल्लीच्या दिशेने आगेकूच केली आहे, असेही हवामान विभागाने सांगितलं.

पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गाला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत मुंबई शहरात १०४ मिमी, पूर्व उपनगरात १२३ मिमी, तर पश्चिम उपनगरात १३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : पहिल्याच पावसात सोलापूरकरांची अशी झाली त्रेधातिरपीट; नालेसफाईचा फोलपणाही उघड

पुढीच पाच दिवस पावसाचा अंदाज

राज्यात पुढील पाच दिवस मोसमी पाऊस सक्रिय असण्याची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळार पाऊस कोसण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, नाशिक या ठिकाणीदेखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, मराठवाड्यातही पावसाचा जोर चांगला राहणार आहे.