Pankaja Munde in Pathardi : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून केंद्रातील अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. भाजपाचे अनेक नेते स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण राज्यभर फिरत आहेत. प्रत्येक बुथवर पोहोचता येतील, इतके नेते भाजापने महाराष्ट्रात पाठवले आहेत, असं पंकजा मुंडे आज पार्थडीत म्हणाल्या. मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ त्या आज पाथर्डीत गेल्या होत्या.
“महायुतीची सत्ता आणण्याकरता आपल्या लेकीने योगदान दिलं आहे. हे आपल्याला सांगायचं नाही का? त्यामुळे एकएक आमदार तिथे हात वर करायला हवा. त्यामुळे आपल्याला आमदार द्यावंच लागतंय. २० तारखेला तुम्ही कमळाच्या फुलासमोरचं बटण दाबा आणि मोनिकाताईंना विजयी करा”, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी आज केलं.
राज्यात काय चाललंय हे बघायला संपूर्ण देश आलाय
त्या पुढे म्हणाल्या, “हे सर्व बाहेरचे बघायला आलेत. संबंध देशातून लोक आलेत. संपूर्ण राज्यभर ९० हजार बुथ आहेत. त्या ९० हजार बुथवर ९० हजार लोक आले आहेत. भाजपाचं काम गडबडच आहे, साधं नाही. त्यामुळे ऑक्सिजन कमी झालाय. सगळे बघायला आलेत राज्यात काय चाललंय? सगळे कव्हर करतायत, रेकॉर्ड कराताहेत.”
?पाथर्डी जि.अहिल्यानगर.
शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहिर सभेस संबोधित केले.
पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील जनता लोकनेते मुंडे साहेबांच्या पासून आमच्यावर प्रेम करणारी… pic.twitter.com/MRRImvtGOQThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) November 16, 2024
“सर्वांनी सांगितलं की पंकजा मुंडेंची सभा पाहिजे. त्यामुळे मी आले. तुम्ही एकदा हेलिकॉप्टर बघायलाच या. मी त्याला म्हटलं खालून खालूनच चालव. पडलं तर जास्त लागणार नाही”, असंही त्या मिश्किलीत म्हणाल्या. आकाशात घिरट्या घालणारं ड्रोन दाखवत पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी हे जे उडतंय अशा हेलिकॉप्टरमध्ये बसून आले, मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टरमध्ये जीव मुठीत धरून आले. आज एवढंसं हेलिकॉप्टर घेऊन मी आले, डबल इंजिनचे हेलिकॉप्टर राजनाथ सिंह यांच्या सभेला गेले. मी म्हणाले, स्कुटरला इंजिन बांधून द्या पण मला सभेला जाऊद्या.”