सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या कणकवली येथील रेल्वे स्थानकावर बाह्य सुशोभीकरण करण्यात आले. विमानतळा सारखा लूक दिसतोय. पण रेल्वे स्थानकावर गेल्यावर उन्हा पावसात उभे राहून रेल्वेत चढ उतार करावा लागतोय. दरम्यान स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रवाशांत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कणकवली रेल्वे स्थानक बाह्य सुशोभीकरण यामुळे चकाचक बनले आहे. कणकवली रेल्वे स्थानकावर एखाद्या विमानतळाला शोभेल असा लूक निर्माण करण्यात आला आहे. मात्र प्रवाशांची गैरसोयीकडे लक्ष दिला गेला नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकावर छप्पर असावे अशी मागणी आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय दुर्लक्षित करून बाह्य सुशोभीकरण झाले.

आणखी वाचा-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांची आजोळच्या मळगाव हायस्कूलला भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कणकवली रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहाची देखभाल करण्याची गरज आहे. त्याकडे कोकण रेल्वे महामंडळाने लक्ष द्यावे. श्री गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांची लवकरच ये जा चालू होईल. त्यामुळे लवकरच स्वच्छतागृह देखील बाह्य सुशोभीकरणाला शोभेल असे असावे असे प्रवाशांचे म्हणणे आहे.