कराड : पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापूर नाका येथे वायु नलिकेसाठी उकरलेल्या खड्ड्यांमुळे, तसेच कोल्हापूर नाका ते वारुंजी फाटा व कोल्हापूर नाका दरम्यान, दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या, तर कराडमध्ये जागा मिळेल तिथे छोट्या व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने बघेल तिकडे वाहतूक जाम आणि गर्दीचा माहोल दिसत होता. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना तासन् तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागले.

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी तीव्र वळणे आणि चिंचोळे बनलेले रस्ते, उकरलेले रस्ते, वाहन बंद पडणे अशा प्रकारांमुळे वाहतूक ठप्प होणे, संथ गतीने चालल्याने वाहतूक कोंडीचा वाहनधारक, चालक, प्रवासी आणि स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

दिवाळी सण असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महामार्गावर वाहनांची संख्या होती, अशातच वाहनचालकांनी जागा मिळेल तिथून वाहन बाहेर रेटण्याचा प्रयत्न केल्याने वाहतुकीची कोंडी अधिकच वाढली. सहापदरीकरणाच्या कामामुळे दोन्ही बाजूची वाहतूक उपमार्गावरून वळवण्यात आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापूर हद्दीत नेहमीच वाहतुकीची संख्या अधिकची असते.

महामार्गावरील वाहतूक आणि दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची वाहने रस्त्यावर आल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी होत राहिली आहे. दोन मिनिटांच्या अंतराला सुमारे तास, अर्धा तास लागत होता.

दिवाळी दोन दिवसांवर आल्यामुळे नागरिकांची आज खरेदीसाठी झुंबड उडाली होती. खरेदी करून परतताना कोंडी झाल्यामुळे अनेकांना वाहतूककोंडीत अडकून पडावे लागले. दरम्यान, दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या, तर कराडमध्ये जागा मिळेल तिथे छोट्या व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने बघेल तिकडे वाहतूक जाम आणि गर्दीचा माहोल दिसत होता. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी तीव्र वळणे आणि चिंचोळे बनलेले रस्ते, उकरलेले रस्ते, वाहन बंद पडणे अशा प्रकारांमुळे वाहतूक ठप्प होणे, संथ गतीने चालल्याने वाहतूक कोंडीचा वाहनधारक, चालक, प्रवासी आणि स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत.