शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झालेले आमदार संतोष बांगर या नाही तर त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला बांगर यांनी शिवीगाळ केल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता बांगर पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संतोष बांगर यांनी वीज कर्मचाऱ्याला फोन करून दमदाटी केली आहे.

हेही वाचा : मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतोष बांगर यांचा प्राचार्यांवर गंभीर आरोप; म्हणाले, “महिलेवर…”

थकीत बिलामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडले होते. ही माहिती गावातील काही आमदार संतोष बांगर यांना दिली. यावर आमदार बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करत दमदाटी केली. “इकडची लाईन तोडू नका, नाहीतर रट्टे देईन,” असा इशारा बांगर यांनी कर्मचाऱ्याला दिला. दरम्यान, संतोष बांगर यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “हे ‘सॅम्पल’ वृद्धाश्रमात पाठवा” उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर बावनकुळे संतापले; म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी, संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवणाऱ्या गोडाऊनच्या व्यवस्थापकाला मारहाण केली होती. तर, पिक विम्याच्या मुद्द्यावरून बांगर यांनी कृषी अधिकक्षकांना शिविगाळ केल्याचं समोर आले होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वीज कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याने संतोष बांगर चर्चेत आले आहेत.