वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पंधरवड्यामध्ये हटवण्यात यावे, अन्यथा मुंबईमध्ये कोल्हापुरी चप्पल मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सोमवारी येथे झालेल्या शिवभक्त लोक आंदोलन समितीच्या सभेत देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानाचा निषेध करण्यासाठी तसेच कोश्यारी यांना पदावरून हटवण्यासाठी आंदोलनाची भूमिका निश्चित करण्याकरिता कोल्हापूरात कोल्हापुरी पायतान मार सभा झाली.

हेही वाचा- ३० नोव्हेंबरला प्रतापगडावर शिवप्रतापदिनाचे आयोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रमुख उपस्थिती

राज्यपाल कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, पंकज चतुर्वेदी यांच्याकडून महापुरुषांविषयी बेताल विधाने केली जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी त्याचे लंगडे समर्थन करू नये. त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा, इशारा देऊन निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी राज्यपालांना पदावरून न हटवल्यास मुंबईत गेट ऑफ इंडिया ते राजभवनपर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

हेही वाचा- “महिलांनी कपडे घातले नसले तरी…” त्या विधानानंतर बाबा रामदेव यांची माफी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकप्पा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस गुलाबराव घोरपडे, बाजीराव नाईक, पंडित पोवार, रघुनाथ कांबळे, सुशीलकुमार कोल्हटकर, अंजली जाधव, शैलजा भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेपूर्वी शाहीर दिलीप सावंत यांनी राज्यपालांचा कवनातून निषेध नोंदवला.