सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आता पावसाळी पर्यटनावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. जिल्हा व्यापारी महासंघाने यासाठी पुढाकार घेतला असून, विविध उपक्रम राबवून जिल्ह्याला बारमाही पर्यटन स्थळ बनवण्याचा मानस व्यक्त केला आहे. मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मे महिन्यातील नुकसानीचा परिणाम आणि पावसाळी पर्यटनाची गरज:

नितीन वाळके यांनी सांगितले की, पावसाळ्यातही पर्यटनाच्या संधी शोधणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे जिल्हा व्यापारी महासंघाने उपक्रम हाती घेण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा व्यापारी महासंघाने पर्यटन व्यावसायिकांसोबत बैठक घेऊन पावसाळी पर्यटनासाठी अनेक तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना आखल्या आहेत.

तात्काळ उपाययोजना: सवलत योजना, डिस्काउंट कुपन योजना, देवदर्शन उपक्रम: जिल्ह्यातील टूर ऑपरेटर्सशी संपर्क साधून श्रावण महिन्यात देवदर्शन उपक्रम आयोजित केला जाईल. जंगल दर्शन: जंगल दर्शन संकल्पनेला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील. विविध साहसी उपक्रम: पावसाळ्यातील खेकडे पकडणे, हुक फिशिंग, पक्षी निरीक्षण, भात शेतीतील सफर, सह्याद्री पट्ट्यातील रिव्हर राफ्टिंग असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

सायकल मॅरेथॉन: पावसाळी पर्यटनामध्ये सर्वांना सामावून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सायकल मॅरेथॉन आयोजित केली जाईल. मोटरसायकल रॅली: गणेश चतुर्थीनंतर सप्टेंबर महिन्यात सागर ते सह्याद्री अशी मोटरसायकल रॅली काढून सह्याद्रीतील सुंदर जंगलांची माहिती दिली जाईल. यात सुमारे ५०० ते ७०० मोटारसायकल चालक सहभागी होतील. सांस्कृतिक कार्यक्रम: मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा आणि नारळ लढविणे स्पर्धा हे कार्यक्रमही पर्यटनाच्या दृष्टीने पुढे आणले जातील. प्रचार-प्रसिद्धी: या सर्व उपक्रमांच्या प्रचार-प्रसिद्धीची जबाबदारी जिल्हा व्यापारी संघ घेणार असून, यासाठी युट्युबर्सची मदत घेतली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीर्घकालीन उपाययोजना (शासनाच्या सहकार्याने):सीवर्ल्ड प्रकल्प: गेली अनेक वर्षे रखडलेला सीवर्ल्ड प्रकल्प येत्या पाच वर्षांत मार्गी लागावा अशी शासनाकडे मागणी आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला प्रचंड मोठा आयाम मिळेल. रेल्वे रो-रो सेवा: पावसाळ्यात कोकणात येण्यासाठी वाहतुकीच्या अडचणींवर मात करण्यासाठी कोकण रेल्वेची रो-रो सेवा (कार ऑन व्हील) च्या धर्तीवर राबवावी, जेणेकरून पर्यटकांच्या कार थेट रेल्वेतून कोकणात दाखल होतील. चिपी विमानतळ: चिपी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करावे.पर्यटन गाईड प्रशिक्षण: पर्यटन गाईड नेमून त्यांना प्रशिक्षण देणे.अप्रकाशित पर्यटनस्थळे: जिल्ह्यातील अप्रकाशित पर्यटनस्थळे समोर आणणे.पर्यटन सर्किट: पर्यटनाच्या विविध प्रकारानुसार वेगवेगळी पर्यटन सर्किट तयार करण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारमाही पर्यटन सुरू राहण्यास मदत होईल आणि जिल्ह्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास नितीन वाळके यांनी व्यक्त केला.