सोलापूर : काँग्रेस आणि भाजपमध्ये अतिशय चुरस पाहायला मिळालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झाली असून त्यानुसार ५९.१९ टक्के मतदान झाले आहे. मागील २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ५८.४६ टक्के मतदान झाले होते. त्यात यंदा ०.७३ टक्का वाढ झाल्याचे दिसून आले.

सोलापुरात एकूण २० लाख ३० हजार ११९ मतदार आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष १२ लाख १५८६ इतके मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ५९.१९ एवढी आहे. झालेल्या मतदानामध्ये पुरूष मतदारांच्या मतांची टक्केवारी ६१.९३ तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी म्हणजे ५६.३० इतकी आहे. इतर मतदारांचे (तृतीय पंथीय) मतदान २८.१४ टक्के झाले आहे.

हेही वाचा >>> विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य; म्हणाले, “त्यांची नार्को टेस्ट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूर मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रांतील मतदानाची आकडेवारी पाहता सर्वाधिक ६३.१५ टक्के मतदान मोहोळमध्ये झाले  आहे. तेथील मतदानाची संख्या दोन लाख १९६५ एवढी आहे. तर  अक्कलकोटमध्ये दोन लाख १२ हजार ७९० मतदान झाले असून त्याची टक्केवारी ५९.१७ एवढी आहे.  सोलापूर शहर उत्तरमध्ये ५९.१५ टक्के मतदान झाले असून तेथील मतदानाची संख्या एक लाख ८४ हजार ६५ इतकी आहे. तर पंढरपूर-मंगळवेढ्यातून दोन लाख ११ हजार २५१ एवढे मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी ५९.०४ एवढी दर्शविते. दक्षिण सोलापूरमध्ये दोन लाख ७४८६ एवढे मतदान (५८.२८ टक्के) झाले आहे. तर सोलापूर शहर मध्य येथे एक लाख ८४ हजार २९ इतके मतदान (५८.८० टक्के) झाले आहे.