सत्तेतील वाटय़ाच्या प्रमाणात सहकारी पक्षांना जागा देतानाच साई संस्थानचे अध्यक्षपद भाजपकडे, तर सिद्धिविनायक देवस्थानचे अध्यक्षपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला आह़े कोल्हापूर संबंधातील वादावरही तोडगा निघेल. पावसाळी अधिवेशनानंतर शिर्डी व सिद्धिविनायक देवस्थानांच्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती गृह, आरोग्य, पर्यटन व ग्रामविकास राज्यमंत्री राम िशदे यांनी दिली़
िशदे यांनी रविवारी सायंकाळी साईदरबारी हजेरी लावली़ त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याला ज्याप्रमाणे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरसंघचालक अशा महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले, त्याच धर्तीवर त्यांना साईसमाधी शताब्दी महोत्सवाच्या काळात शिर्डीला येण्याकरिता निमंत्रित करण्यात येईल़ कुंभमेळ्याकरिता शासनाने भरीव निधी दिला आह़े त्याचप्रमाणे दोन वर्षांत साईसमाधी शताब्दी सोहळा मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येणार आह़े या काळात देश-विदेशातून भाविक शिर्डीला येणार आहेत़ त्यादृष्टीने शिर्डीत पायाभूत सुविधा उभारण्याकरिता केंद्र व राज्य सरकार मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल.
पुढील महिन्यात नाशिक-त्र्यंबकेश्वरला कुंभमेळ्याकरिता येणाऱ्या भाविकांपैकी जवळपास २५ टक्के भाविक शिर्डी व िशगणापूरला येतील, असा प्रशासनाचा अंदाज आह़े त्यादृष्टीने वाहनतळे, सुरक्षाव्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे, वाहतुकीसाठी बाह्य़वळण रस्ते, क्लोज सर्किट कॅमेरे आदींची सुविधा करण्यात येत असल्याचे िशदे यांनी सांगितल़े
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने संस्थानच्या तिजोरीतून शिर्डी विमानतळाला पन्नास कोटींचा निधी दिल्यानंतर भाजप-शिवसेनेने आंदोलन केले होत़े आता सत्तेत आल्यानंतर भाजप-शिवसेनेने जलशिवार, आरोग्य विभागासाठीची यंत्रणा, कालवे यासाठी शेकडो कोटी रुपये संस्थान तिजोरीतून काढत असल्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला़
सिंहस्थ काळात वाहतुकीला अडचण येऊ नये याकरिता शहरात संस्थान निधीतून सुरू असलेल्या रस्त्यांची कामे रखडली आहेत त्याचा आढावा घेण्यात येईल़ भाविकांना पोलिसांकडे तक्रार करणे सोपे जावे यासाठी मंदिर परिसरात साई संस्थानने जागा उपलब्ध करून दिल्यास औटपोस्ट सुरू करण्यात येईल, संस्थान सुरक्षारक्षकाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही िशदे यांनी सांगितल़े