सांगली : शेततळ्यातील पाण्यात बुडून दोन लहान भावांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी बेडग (ता. मिरज) येथे घडली. नागरगोजेवस्ती रस्त्यावर असलेल्या एका शेततळ्यात बुडून आयन युनूस सनदी (वय ९) आणि अफान युनूस सनदी (वय ५) या दोन मुलांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – “एका व्यक्तीच्या अहंकारामुळे मुंबईचा विकास अडीच वर्षे…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

हेही वाचा – “राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून…”, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयन आणि अफान हे दोन भाऊ शाळेतून वस्तीवर घरी जात होते. नागरगोजे वस्तीवर सरकारी शेततळे आहे. या ठिकाणी लहान मुलगा अफान हा पाण्यात अगोदर गेला. त्याला वाचविण्यासाठी मोठा मुलगा आयन हाही पाण्यात उतरला. त्याला लहान भावाने मिठी मारल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत अशी नोंद करण्यात आली आहे.