scorecardresearch

Premium

यवतमाळमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात हे तरुण पैनगंगा नदीत बुडाले

drowned-death
प्रातिनिधिक छायाचित्र

यवतमाळमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सेल्फी काढण्याच्या नादात हे तरुण पैनगंगा नदीत बुडाले. सेल्फी काढत असताना बोट उटलल्याने ही दुर्घटना झाली. दरम्यान या दुर्घटनेत तीन तरुण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहर्रमनिमित्त हे तरुण यवतमाळला आले होते. आदिलाबाद येथून आलेले पाचही मित्र बोट घेऊन नदीपात्रात उतरले होते. पाचही मित्र आंघोळ करण्यासाठी पैनगंगा नदीत उतरले होते. यावेळी बोटीत बसून सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मात्र सेल्फी काढत असताना बोट उलटी आणि सर्व तरुण बुडाले.

या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तिघे वाचले आहेत. मृतांची नावे शेख अर्षद आणि शेख सुफीर सिराज अशी आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two youngsters drown in river while taking selfie yavatmal

First published on: 20-09-2018 at 15:48 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×