प्रत्येकाची बुद्धी असते त्याप्रमाणे ते बोलतात. कोण काय बोलले याकडे मी लक्ष देत नाही. त्याला फारसे महत्व देत नाही. त्यांच्याबरोबर सरकारी, सहयोगी असतील. महाराष्ट्रात जे घडले त्याबाबत लोकांत जागृती केली पाहिजे. माझे नाव घेतल्याशिवाय काही लोक मोठी होऊ शकत नाहीत, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळून लगावला. दरम्यान, पक्षाने दखल घेतली नाही. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. त्यामुळे लोकांनी त्यांची दखल घेतली तर अडचण होईल, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

हेही वाचा- ‘…तर मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला सीमा ओलांडून जावे लागेल” ; धनंजय मुंडेचं विधान!

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंच्या आंदोलनाची खिल्ली उडवत त्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करावे, असा सल्ला दिला होता. त्यावर खासदार उदयनराजे म्हणाले, ‘आम्ही आंदोलन करत नाही. तसेच कोण काय बोलले याकडेही लक्ष देत नाही. प्रत्येकाची बुद्धी असते त्याप्रमाणे बोलतात. त्याला मी फारसे महत्व देत नाही.

हेही वाचा- “…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल”; शिवरायांचा संदर्भ देत संभाजीराजे छत्रपतींचा ‘जशास तसे उत्तर’ देण्याचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतका आवाज उठवूनही पक्षाकडून दखल घेतली जात नाही, तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, लोकशाहीत मतदार हा राजा असतो. त्यांच्याशिवाय कोणताही पक्ष मोठा होऊच शकत नाही. त्यांनी दखल घेतली नाही. पण, लोकांनी त्यांची दखल घेतली तर अडचण होईल. कोणत्याच पक्षाने दखल घेतली नाही, त्यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही टप्याटप्प्याने पुढे जाणार आहोत, असं उदयनराजे म्हणाले.
जे घडलंय त्याविषयी लोकांना सांगितले पाहिजे. यात कोणतेही राजकारण नाही. पण, येथील लोकप्रतिनिधी म्हणतात राजकारण करत आहेत. छत्रपतींचा अवमान होत असेल या वाड्यात मलाच काय त्यांनाही व इतर कोणालाच राहण्याचा अधिकार नाही. घराण्याचे नाव लावतात, मात्र करणार काहीच नाहीत. जे काय राजकारण करायचे ते करु देत त्यांना. पण, आम्हाला लेाकांची सेवा आणि समस्या सोडवायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊनच वाटचाल करणार आहोत, असे उदयनराजे यावेळी ते म्हणाले.