वाई : साताऱ्याला पुन्हा आज अवकाळी पावसाचा दणका दिला. ढगांच्या गडगडाटात विजांच्या कडकडाटात गरपीठिसह झालेल्या मुसळधार पावसाने गहू, ज्वारी, स्ट्रॉबेरी भाजीपाला आदी शेती पिकांचे मोठे नुकसान केले. पाचगणी वाईत गारांचा मोठा पाऊस झाला. तलाठ्यांच्या संपाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे लांबले आहेत. पाचगणीच्या टेबलवर फिरत असणाऱ्या दांडेघर (ता महाबळेश्वर) येथील दोन म्हशी वीज पडून ठार झाल्या . शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.

साताऱ्यात वाई पाचगणीसह बुधवारी अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.आजही सकाळपासूनच आकाशात अवकाळी पावसाच्या ढगांची मळभ दाटली होती. अखेरीस संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी अवकाळी पावसामुळे सातारकरांना ऐन ऊन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती मिळाली. या पावसाने सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले असून वातावरणात मोठा गारवा पसरला आहे.

हेही वाचा… पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

बुधवारी अचानक झालेल्या पावसाने शेतात काढणीला आलेल्या गहू ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी शेतात मळून ठेवलेला गहू ज्वारी अचानक आलेल्या पावसाने भिजल्यानेही मोठे नुकसान झाले आहे .याशिवाय भाजीपाला कोबी फ्लावर शेतात पाणी साठल्याने पिकांवर मोठा परिणाम होणार आहे.

हेही वाचा… पिंपरी- चिंचवड शहरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचगणी, वाई, जावली परिसरात गारांचा पाऊस झाला त्यावेळेस स्ट्रॉबेरी पिकाचेही मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची त्रेता तिरपीट उडाली. पुढील ३-४ दिवस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह गारपीठ आणि वादळी वारे विजांच्या कडकडाटासह वाहतील. तसेच या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.