सावंतवाडी : बदलत्या हवामानामुळे वारंवार अचानक पाऊस कोसळत असल्याने शेतकरी व बागायतदार यांच्यासहित नागरिकांत धावपळ उडाली. आज गुरुवारी सायंकाळी आकाशात ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला.

एकादशी निमित्ताने तुळशी लग्न समारंभ सुरू आहेत. तसेच श्री देव विठोबाचा जत्रोत्सव झाला, यानंतर देव देवतांचे जत्रोत्सव सुरू होतात. त्यामुळे जय्यत तयारी, मंदिर रंगरंगोटी केली जाते. या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली आहे. आज गुरुवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी व बागायतदारांची चिंता वाढली तर बाजारात पेठेत ग्राहक व विक्रेत्यांची धावपळ उडाली.

हेही वाचा : Radhakrishna Vikhe Patil : “राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जायचा प्रस्ताव..” राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाचा चार महिन्यांचा हंगाम यंदा एका महिन्याने वाढला. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. दिवाळी दरम्यान गुलाबी थंडीची चाहूल लागली तर आंबा व काजू बागायतदार खूष असतात. यामुळे फळझाडांना मोहर यायला पोषक वातावरण निर्माण झालेले असते,पण यंदाच्या हंगामात लांबलेला पावसामुळे जमिनीला ताण निर्माण झाला नसल्याने फळबागा उशीराने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.