Radhakrishna Vikhe Patil : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढच्या आठवड्यात पार पडणार आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतो आहे. काय होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधींनी आपल्याला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला होता असं सांगितलं आहे. २०१९ मध्ये राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) भाजपात आले. त्यावेळी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी यामागचं कारण उलगडलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपात अहमदनगर दक्षिणच्या जागेवरुन संघर्ष होता. औरंगाबादमध्ये काँग्रेस सलग १२ वेळा हरलेली आहे. तर, अहमदनगर दक्षिणमध्ये सलग तीनवेळा राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत झालेली आहे. त्यामुळे, येथील जागांची अदलाबदली करा असं आम्ही म्हणत होतो. मी शरद पवारांनाही अनेकदा याबाबत बोललो होतो. पण, कार्यकर्ते माझं ऐकत नाहीत, असं शरद पवार मला म्हणाले. आता, कार्यकर्ते त्यांचं ऐकत नाही हे कुणाला तरी पटेल का? असं राधाकृष्ण पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) म्हणाले. तसेच, याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी मी राहुल गांधींना भेटलो, तेव्हा मल्लिकार्जुन खरगेही होते. त्यावेळी, अहमद पटेल यांच्याशी फोनवर बोलणं झाल्यानंतर राहुल गांधी स्वत:च मला म्हटले की, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस का जॉईन करत नाहीत. कारण, आघाडीमध्ये ही जागा त्यांच्या वाट्याला गेली आहे, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. जर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षच मला दुसऱ्या पक्षात जाण्याचा सल्ला देत असतील तर, मी नमस्कार केला आणि आभार मानले, असा किस्सा विखे पाटील यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात सांगितला. पुढे पाटील म्हणाले खरगे बाहेर आले त्यांनी माझी समजूत काढण्याचाही प्रयत्न केला असंही राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी स्पष्ट केलं.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हे पण वाचा- Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या

मी काय राजकीय आत्महत्या करायची होती का?

जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवारांचं ऐकत नाहीत, तिथं मी तिकीट घेऊन राजकीय आत्महत्या करायची होती का? असा सवालही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करत आपली त्यावेळची राजकीय भूमिका स्पष्ट केली. तसंच भाजपात प्रवेश करणं हे मला जास्त सोयीचं वाटलं असंही त्यांनी सांगितलं. २०१९ मध्ये राहुल गांधी अध्यक्ष होते. राहुल गांधीच मला राष्ट्रवादीत जायला सांगत होते. मला आणि सुजयला त्यांनी पक्षातून दूर ढकललं असंही राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी सांगितलं.

Story img Loader