माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते, असा खळबळजनक दावा भाजपा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केला होता. त्यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, नितेश राणेंच्या या दाव्याला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं असून नितेश राणे म्हणजे गेलेली केस आहे, असं ते म्हणाले. रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…तेंव्हा आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते”; नितेश राणेंचा खळबळजनक दावा!

काय म्हणाले विनायक राऊत?

नितेश राणेंना आम्ही फार किंमत देत नाही. त्यांना गांभीर्याने घेण्याचीही गरज नाही. मुळात नारायण राणे आणि नितेश राणे ही गेलेली केस आहे. त्यांना भाजपाने केवळ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर भुंकण्यासाठी पाळलंय आहे, असं प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी दिलं.

हेही वाचा – “निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी विवाह केला…”, जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटवर चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, “लव्ह जिहादचं निर्लज्जपणे समर्थन करणारेच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, आज सकाळी माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंबाबत मोठा दावा केला होता. “उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र रचत होते. माझे वडील आजारी आहेत, आता ते बरे होणार नाहीत असं ते सांगायचे. त्यासाठी जसलोक रुग्णालयातील एका खोलीत बैठका झाल्या. रुग्णालाच्या कोणत्या खोलीत या बैठका झाल्या हे मला माहिती आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज मी देऊ शकतो”, अस ते म्हणाले होते. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केल्यानंतर हे प्रकरण थांबलं, असंही त्यांनी सांगितलं होतं.