वर्धा : प्रेयसीच्या धमकीपोटी प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विरुळ गावातील आशिष बोकडे नावाच्या 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणाचे एका 40 वर्षाच्या महिलेसी प्रेमसंबंध होते. मात्र महिलेकडून पैशांसाठी तगादा आणि धमकी मिळत असल्यामुळे या तरुणाने स्वत:ला संपवल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> विधानपरिषद उमेदवारीवरुन पंकजा मुंडे यांचे मोठे विधान, म्हणाल्या, “लवकरच…”

मिळालेल्या माहितीनुसार विरुळ गावातील आशिष बोकडे याचे गावालगत राहणाऱ्या महिलेशी सूत जुळल्यानंतर ते एकत्रच राहत होते. मात्र पुढे घरच्यांनी लग्नाची चर्चा सुरू केल्याने आशिषने महिलेपासून दूर राहायला सुरवात केली. याच कारणामुळे महिलेने आशिष बोकडे याला त्रास तसेच धमकावणे सुरू केले. तुझे लग्न कसे होते ते बघतेच. दोन लाख रुपये दे, नाहीतर पोलीस तक्रार देऊन तुला फसवेन, अशा प्रकारच्या धमक्या ही महिला आशिष बोकडे याला देऊ लागली. पुढे याच धमक्यांनी आशिष त्रस्त झाला.

हेही वाचा >>> “अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या वाझेला माफीचा साक्षीदार करून उद्या भाजपावासी केले तर…”; शिवसेनेचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेच्या एका सहकाऱ्यानेही पैशाचा तगादा लावला होता. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून आशिषने मांडवा शिवारातील एक झाडाला गळफास घेतला. या प्रकरणी सावंगी पोलिसांनी आज दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या आईने याप्रकरणी तक्रार केली आहे. आरोपी महिला दूरवर राहत असल्याने तिला एक दोन दिवसात अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक जळक यांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.