01 December 2020

News Flash

हॅप्पी बर्थडे हृतिक!: जाणून घ्या हृतिकबद्दलच्या दहा गोष्टी

बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आज (१० जानेवारी) आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.

| January 10, 2015 01:01 am

बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आज (१० जानेवारी) आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. ऋतिकचा जन्म १९७४ मध्ये झाला होता. २००० साली ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि तो रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला. लाखो मुलींच्या हृदयाचे ठोके चुकवणा-या हृतिकबद्दलच्या या दहा गोष्टी तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडतील.

१. १९८० साली हृतिक पहिल्यांदाच कॅमे-यास सामोरा गेला. त्यावेळी तो ६वर्षांचा होता. ‘आशा’ चित्रपटात त्याला अतिरीक्त कलाकारांमध्ये घेण्यात आले होते.

२. तो नेहमी त्याच्याजवळ एक स्क्रॅपबूक बाळगतो. या स्क्रॅपबूकमध्ये त्याच्या रोजच्या दिनचर्येतील गोष्टी छायाचित्रासह तो यात नमूद करतो.

३. २००० साली त्याला ३० हजार चाहत्यांकडून लग्नाच्या मागण्या आल्याचे स्वतः त्यानेच सांगितले आहे.

४. राकेश रोशन यांच्यावर झालेल्या माफियांच्या हल्ल्यामुळे हृतिकला मोठा धक्का बसला होता.त्यानंतर चित्रपटसृष्टी सोडण्याचा विचार त्याच्या मनात होता.

५. ज्यावेळी हृतिक त्याच्या वडिलांना चित्रपटांच्या सेटवर मदत करत होता तेव्हा त्याने कलाकारांना चहा देण्यापासून ते अगदी केरसूणी मारण्यापर्यंतचे काम केले आहे.

६. हृतिक पैसे हाताळण्यास अकार्यक्षम असल्यामुळे आर्थिक व्यवहारांसाठी तो त्याच्या आई-वडिलांवर अवलंबून असतो.

७. त्याला लहानपणी तोतरे बोलण्याची समस्या होती. ही समस्या सोडवण्यासाठी त्याने स्पष्ट बोलण्याचे क्लासेस घेतले आणि आता तो बॉलीवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेता आहे.

८. सुदृढ शरिरासाठी हृतिकचे असणारे प्रेम हे सर्वांनाच माहित असेल, पण जर त्याची प्रकृती बिघडली तर तो फार उदास होतो.

९. मधुबाला आणि परवीन बाबी या त्याच्या आवडत्या अभिनेत्री असून, त्याचे यांच्यावर क्रश असल्याचे तो स्वतः मान्य करतो.

१०. नृत्यासाठी असलेले हृतिकचे वेड कोणाला माहित नाही असे नाही. पण, तो २१ वर्षांचा असताना त्याच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे आपण यापुढे कधीच नाचू शकणार नाही अशी भीती त्याच्या मनात तेव्हा निर्माण झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:01 am

Web Title: 10 unknown facts about hrithik roshan
टॅग Hrithik Roshan
Next Stories
1 शाहरुखच्या डोक्यावर शिंगांचा मुकुट
2 चित्रपटांमधून मानवी पेहरावाचा पट उलगडणार
3 रंगकर्मी अशोक मुळ्ये संकल्पित ‘माझा पुरस्कार’सोहळा सोमवारी रंगणार
Just Now!
X